वृत्तसंस्था
मुंबई : देशात जुलैमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता चौथ्या क्रमांकावर आहे. मृत्यूदरात पंजाब राज्य पहिल्या क्रमांकावर, उत्तराखंड दुसऱ्या आणि नागालँड तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. दर तासाला कोरोना १४ लोकांचा बळी घेत आहे. Maharashtra fourth in corona mortality; 14 victims per hour; Punjab ranks first
जुलैमध्ये मृत्यूदर २.०२ टक्के होता, तो आता २.१२ टक्क्यांवर पोहोचला आहे. सप्टेंबरपासून हा मृत्यूदर स्थिर आहे. राज्यातील १९ फेब्रुवारी ते २२ ऑक्टोबर या कालावधीतील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा काढला तर दर तासाला सरासरी १४ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.
सप्टेंबरपर्यंत राज्यात दर तासाला मृत्यूची संख्या १६ होती, ती ऑक्टोबरमध्ये ती थोडी कमी झाली असल्याने दिलासा मिळत आहे. मुंबईसह राज्यात कोरोनाची दुसरी लाट १० फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे.
९ मार्च २०२० रोजी सुरू झालेल्या साथीच्या आजाराने आतापर्यंत १,३९,९२५ लोकांचा बळी घेतला आहे. पहिल्या लाटेत ९ फेब्रुवारीपर्यंत ५१,३६० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीपासून म्हणजेच १० फेब्रुवारी ते २८ सप्टेंबरपर्यंत ८७,४५२लोकांचा मृत्यू झाला.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन महिन्यांत अनेक सण येणार आहेत. याच दरम्यान काही समारंभाचं देखील आयोजन करण्यात येईल. मात्र यामुळेच लोकांची मोठ्या संख्येने गर्दी होईल आणि हेच कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यामागचं कारण ठरू शकतं.
डेल्टा व्हेरियंटचा कहर वाढला
सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे. लोकांनी अत्यंत सतर्क राहणं गरजेचं आहे. घरच्या घरीच सण साजरे करा. सणांच्या काळात लोकांचा हलगर्जीपणा चिंता वाढवू शकतो. त्यामुळचे कोरोना नियमांचं पालन करा असे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.
Maharashtra fourth in corona mortality; 14 victims per hour; Punjab ranks first
महत्त्वाच्या बातम्या
- SAMEER WANKHEDE : समीर वानखेडेंच्या आई-बहिण यानंतर आता वडिलांनाही ओढले वादात ! नवाब मलिक म्हणतात ‘ज्ञानदेव’ की ‘दाऊद’ ?पोस्ट केला आणखी एक फोटो
- वसुली हा विरोधकांचा एकमेव धंदा; स्मृती इराणी यांची दादरा नगर हवेलीत प्रचार सभेत शिवसेनेवर टीका
- बांगलादेशात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याची हिंदू-मुस्लीम आरोपींची कबुली
- काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची शोध मोहीम पंधराव्या दिवशीही सुरूच