• Download App
    काश्मी र खोऱ्यात दहशतवाद्यांची शोध मोहीम पंधराव्या दिवशीही सुरूच|Search is going in Kashmir valley

    काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची शोध मोहीम पंधराव्या दिवशीही सुरूच

    विशेष प्रतिनिधी

    जम्मू  : जम्मू- काश्मीlरच्या पूँच आणि राजौरी जिल्ह्यांत सुरक्षा दलांची दहशतवाद्यांविरोधातील तपास मोहीम सलग पंधराव्या दिवशी सुरूच होती. भट्टीदुरियान या जंगल परिसरात नव्याने दहशतवादी आणि सुरक्षा दले यांच्यात चकमक झाल्याची माहिती समोर आलेली नाही. या जंगलांमध्ये काही गुहा असून त्यातच दहशतवादी दबा धरून बसल्याचे बोलले जाते.Search is going in Kashmir valley

    या भागातील संघर्षामध्ये सुरक्षा दलांचे नऊ जवान हुतात्मा झाले असून अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. एक अटकेत असलेला दहशतवादी देखील या चकमकीमध्ये मारल्या गेला आहे. ११ ऑक्टोबर रोजी या भागात सुरक्षादलाची ही मोहीम सुरू झाली होती.



    सुरानकोट आणि मेंढर या भागांबरोबरच थानामंडी या वन परिसरात देखील शोध मोहीम सुरू आहे. सध्या येथील जंगल परिसरावर लष्कराचे हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागले असून देखरेखीसाठी ड्रोनचा देखील वापर केला जात आहे. या भागांत दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या बारापेक्षाही अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यात दोन महिलांचा देखील समावेश आहे.

    Search is going in Kashmir valley

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Daily Essentials : साबण-बिस्किटपासून तेलापर्यंत सर्व काही महाग होणार; डाबर, HUL सह FMCG कंपन्या किमती वाढवणार; पॅकेजिंग आणि कच्च्या मालाची किंमत वाढली

    China Admits : ऑपरेशन सिंदूरदरम्यान चीनची पाकिस्तानला मदत; चीन आणि तुर्कस्तान दोघांनी मदत केल्याची कबुली

    बंगालमध्ये हिंदुत्ववादी सरकार स्थापन होताना मुंबईत मात्र “मुसलमानों का सियासी अजेंडा” पुस्तकाचे प्रकाशन!!