उत्तर प्रदेशासह भाजपने चार राज्ये जिंकली काय आणि महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारला जणू सुरुंग लावायला काही लोक बसल्याचे दिसायला लागले आहे… अर्थात हा सुरुंग महाविकास आघाडीच्या बाहेरून नव्हे, तर महाविकास आघाडीच्या आतूनच लागतोय की काय…?? अशी खात्रीशीर शंका निर्माण व्हायला लागली आहे.Ketkar – Chavan’s “invitation” to BJP to overthrow the Congress High Command government
काँग्रेस हायकमांडच्या जवळचे खासदार कुमार केतकर आणि हायकमांडच्या जवळचे दुसरे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची कालची आणि आजची वक्तव्ये “डोळे उघडून नीट” बघितली तर महाविकास आघाडी किती अस्थिर आहे, हेच स्पष्ट होते. महाविकास आघाडी सरकार केव्हाही पडू शकते, असे वक्तव्य कुमार केतकर यांनी कालच्या विश्लेषणात केले आणि आज त्याला पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील दुजोरा देऊन टाकला.
अर्थात दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यामुळे जर-तरची भाषा होती पण त्या जर-तरच्या भाषेतही महाविकास आघाडी सरकार भाजपने पाडले, अशी तक्रार करायला वाव ठेवण्यात आला आहे. म्हणजे भाजपने जणू महाविकास आघाडी फोडावी, असे निमंत्रणच हे दोन नेते भाजपला देताना दिसत आहेत…!!
काँग्रेस हायकमांडचा मनसुबा??
काँग्रेस हायकमांडच्या मनसुब्यातून हे दोन नेते महाविकास आघाडी सरकार पोखरायच्या कामाला लागले आहेत का…?? पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यातून तरी तसे दिसते. भाजपने महाविकास आघाडी एखादा घटक फोडला तर सरकार पडेल, असे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. याचा अर्थ महाविकास आघाडीतला घटक पक्ष फुटायला तयार आहे. तो भाजपने फोडावा, असे हे “निमंत्रणच” आहे का…??
आणि जेव्हा काँग्रेस हायकमांडच्या जवळचे असणारे केतकर आणि चव्हाण हे नेते महाविकास आघाडी सरकार केव्हाही पडू शकते, असे विधान करतात तेव्हा या दोन नेत्यांच्या तोंडून काँग्रेस हायकमांडच “बोलत” असते का…??, अशी शंका कोणी व्यक्त केली तर ती “अरास्त” मानता येणार नाही…!!
राहुल गांधींचे संजय राऊतांना पत्र
काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडलवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांचे एक पत्र शेअर केले होते. तुम्ही केंद्रातल्या मोदी सरकार विरुद्ध लढत राहा. केंद्रीय तपास संस्था बिगर भाजप सरकारवर अन्याय करत आहेत. त्याविरुद्धच्या लढ्यात आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, असे राहुल गांधी यांनी संजय राऊत यांना या पत्रात लिहिले होते. हे पत्र संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करून महाराष्ट्रातल्या काँग्रेसजनांना काही “इशारा” दिला होता का…??
संजय राऊतांना माहिती होते??
काँग्रेस पक्षातला एक घटक महाविकास आघाडी सरकार अस्थिर करू शकतो, याची जाणीव संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वी झाली होती का…?? आणि म्हणूनच त्यांनी राहुल गांधी यांचे पत्र आपल्या ट्विटर हँडल वर शेअर करुन काँग्रेस महाराष्ट्रातल्या स्थानिक काँग्रेस नेत्यांना कोणतेही “वेगळे” पाऊल उचलू नये!!, असा इशारा दिला होता का…??, अशी शंकाही यानिमित्ताने येत आहे.
राजकीय हिंट!!
पण त्या पलिकडे जाऊनही कुमार केतकर आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या केंद्रीय पातळीवर बहुतेक राजकारण करणाऱ्या नेत्यांनी जर महाराष्ट्रातले सरकार अस्थिर आहे आणि ते केव्हाही पडू शकते, अशी उघड “राजकीय हिंट” दिली असेल तर काँग्रेस हायकमांड आता महाविकास आघाडी सरकारला कंटाळले आहे, असाच त्याचा अर्थ काढायचा का…??, हा या घडामोडीतला सर्वात महत्त्वाचा सवाल आहे.
केतकर – चव्हाण – पवार संबंध
यातला आणखीन एक महत्त्वाचा राजकीय बारकावा बघितला तर पृथ्वीराज चव्हाण आणि कुमार केतकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गूड बुक्स समजले नाहीत. दोन्ही नेत्यांचा शरद पवार यांना असलेला वैचारिक आणि राजकीय विरोध स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना हवे असलेले सरकार केतकर आणि चव्हाण यांना आता नकोसे झाल्याचे वाटते आहे का…?? म्हणूनच त्यांनी एक प्रकारे महाविकास आघाडी सरकार अस्थिर आहे आणि ते केव्हाही पडू शकते, असे वक्तव्य केले आहे का…??, विचार करायला लागेल असे हे असा हा मुद्दा आहे…!!
Ketkar – Chavan’s “invitation” to BJP to overthrow the Congress High Command government
महत्त्वाच्या बातम्या
- पुलावरुन नदीत उडी मारलेल्या डिलीव्हरी बाॅयचा मृत्यु
- पंजाबमध्ये खलिस्तानी फंडिंगमुळे ‘आप’ ने विजय मिळवला शीख फॉर जस्टिसचा गंभीर आरोप
- Thackeray – Pawar Govt : भाजपने महाविकास आघाडी फोडली तर सरकार पडेल; कुमार केतकरांच्या पाठोपाठ बोलले पृथ्वीराज चव्हाण!!
- कायदा आणि सुव्यवस्थेला कौल, पण त्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी घेतला खतरनाक गुन्हेगारांशी पंगा