• Download App
    करिना, कतरिना, दिशाला पैसे देऊन शिवसेना करून घेते ट्विट, प्रतिमा संवर्धनासाठी शिवसेनेने नेमली एजन्सी Kareena, Katrina, Disha gets paid by Shiv Sena to tweet, Shiv Sena appointed agency for image enhancement

    करिना, कतरिना, दिशाला पैसे देऊन शिवसेना करून घेते ट्विट, प्रतिमा संवर्धनासाठी शिवसेनेने नेमली एजन्सी

    ठाकरे सरकारने आपल्या प्रतिमा संवर्धनासाठी रेन ड्रॉप या एजन्सीला काम दिले आहे. ही एजन्सी दिशा पटानी, करिना कपूर, कतरिना कैफ, फरहान खान यांच्यासारख्या अनेक कलाकारांच्या संपर्कात आहे. त्यांना पैसे देऊन शिवसेनेसाठी ट्विट करून घेतले जाते, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. Kareena, Katrina, Disha gets paid by Shiv Sena to tweet, Shiv Sena appointed agency for image enhancement


    प्रतिनिधी

    मुंबई : ठाकरे सरकारने आपल्या प्रतिमा संवर्धनासाठी रेन ड्रॉप या एजन्सीला काम दिले आहे. ही एजन्सी दिशा पटानी, करिना कपूर, कतरिना कैफ, फरहान खान यांच्यासारख्या अनेक कलाकारांच्या संपर्कात आहे. त्यांना पैसे देऊन शिवसेनेसाठी ट्विट करून घेतले जाते, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

    राणे म्हणाले, तुम्ही करिना कपूर किंवा कतरिना कैफ यांची अलीकडची ट्विटस बघा. या बॉलिवूड सेलिब्रिटींकडून पैसे देऊन ट्विट करवून घेतले जात आह. ठाकरे सरकार कोरोनाची खरी परिस्थिती लपवण्यासाठी आणि आपल्या प्रतिमा संवर्धनासाठी बॉलिवूड कलाकारांकडून ट्विट करवून घेते. त्यासाठी शिवसेना भवनावरून अनेक कलाकारांना फोन केले जातात.



    राणे म्हणाले, आगामी अधिवेशनात मी हे सर्व पुरावे मांडून सर्वांना उघडं पाडणार आहे. कोणाला आतापर्यंत किती पैसे देण्यात आलेत, किती बिलं झालेत, हे सर्व मला माहिती आहे. छोट्या कलाकारांना ट्विट करण्यासाठी साधारण तीन लाख आणि बड्या कलाकारांना त्यापेक्षाही जास्त रक्कम मिळते.

    ठाकरे सरकारकडून गाजावाजा केले जाणारे मुंबई मॉडेल इतकेच यशस्वी असेल तर लॉकडाऊन 31 मे पर्यंत का वाढवण्यात आला, असा सवाल करून नितेश राणे म्हणाले, ठाकरे सरकार कोरोनाचे खरे आकडे लपवत आहे. त्यांना राज्यातील परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव आहे. बेडस आणि ऑक्सिजनचा अजूनही तुटवडा आहे. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये लॉकडाऊन हटवण्याची हिंमत नाही. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या खरोखरच कमी झाली असती तर अनलॉक झाले पाहिजे होते. दुकाने आणि इतर व्यवहार सुरु करायला परवानगी दिली पाहिजे होती.

    Kareena, Katrina, Disha gets paid by Shiv Sena to tweet, Shiv Sena appointed agency for image enhancement

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पुरोगामी महाराष्ट्राच्या नुसत्याच तोंडी वाफा; दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी घरात काढल्या झोपा!!; वाचा मतदानाचा आकडा!!

    नाही सुचल्या नव्या आयडिया, एकमेकांच्या कॉप्या हाणा; ठाकरे + पवारांच्या प्रचाराची तऱ्हा!!

    पवार म्हणतात, भाजप नको, दादांसकट सगळे चालतील, पण पवार भाजपला का घाबरतात??; आणि ते फक्त भाजपलाच घाबरतात का??