• Download App
    मोदी सरकारची स्तुती आनंद शर्मांचा काँग्रेसच्या नव्या समीकरणांमधून काही मिळविण्याचा प्रयत्न की आणखी काही... | The Focus India

    मोदी सरकारची स्तुती आनंद शर्मांचा काँग्रेसच्या नव्या समीकरणांमधून काही मिळविण्याचा प्रयत्न की आणखी काही…

    देशात पायाभूत सुविधा वाढविल्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारांचे आनंद शर्मांकडून अभिनंदन

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : “कोरोनासारख्या संकटकाळात केंद्र आणि राज्य सरकारांनी एकदिलाने कामे करून पायाभूत सुविधा वाढविल्या मी त्यांचे अभिनंदन करतो, असे सांगून काँग्रेसचे जी २३ नेते आनंद शर्मांनी आज परत एकदा मोदी सरकारविषयी अनुकूल प्रतिक्रिया व्यक्त केली. India has increased its infrastructure says anand sharma

    या आधीही अनेकदा आनंद शर्मांनी सॉफ्ट लाइन स्वीकारत मोदी सरकारविषयी अनुकूल मते व्यक्त केली आहेत. त्यात देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी आज केलेल्या वक्तव्याची भर पडली आहे. आनंद शर्मा म्हणाले, की कोरोना लॉकडाऊनमुळे २०२० च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी अभूतपूर्व घसरला होता. तो आता सावरतो आहे. India has increased its infrastructure says anand sharma

    अर्थव्यवस्थाही वेगाने सुधारते आहे. गेल्या दोन तिमाहींमधील आकडेवारी सकरात्मक अंगुलीनिर्देश करताना दिसते आहे. २०२१ च्या येत्या दोन तिमाहींमध्ये अर्थव्यवस्था आणखी वेग घेण्याची शक्यता वाढली आहे.

    काँग्रेसमध्ये काही राजकीय बदल घडून येत असताना आनंद शर्मा यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याने मोदी सरकारविषयी अनुकूल मत व्यक्त करणे तसेच राज्य सरकारांचीही स्तुती करणे याला राजकीय महत्त्व आहे.

    India has increased its infrastructure says anand sharma

    यात काँग्रेसमध्ये राहुनच काही राजकीय समीकरणांमध्ये समाविष्ट होण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो किंवा काँग्रेसमध्ये नव्या परिस्थितीत काही मिळाले नाही, तर मोदी सरकारशी जवळीक साधण्याचा दरवाजा किलकिला करण्याचाही या विधानांमागे अर्थ असू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…