लॉकडाऊनच्या काळात मोडकळीस आलेला हॉटेल व्यवसाय आता कोठे सावरू लागला होता. ख्रिसमस आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला हॉटेलांमध्ये पुन्हा पहिल्यासारखी वर्दळ पाहायला मिळण्याची शक्यता होती. मात्र, पुन्हा रात्रीचा कर्फ्यू लावल्याने नाराज झालेले हॉटेल व्यावसायिक मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची तक्रार शरद पवार यांच्याकडे करणार आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात मोडकळीस आलेला हॉटेल व्यवसाय आता कोठे सावरू लागला होता. ख्रिसमस आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला हॉटेलांमध्ये पुन्हा पहिल्यासारखी वर्दळ पाहायला मिळण्याची शक्यता होती. मात्र, पुन्हा रात्रीचा कर्फ्यू लावल्याने नाराज झालेले हॉटेल व्यावसायिक मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची तक्रार शरद पवार यांच्याकडे करणार आहे.
hotel businessman sharad pawar uddhav thackeray news
उध्दव ठाकरे यांनी आदल्या दिवशीच राज्यात पुन्हा लॉकडाऊन किंवा कर्फ्यू लावणार नाही असे आश्वासन दिले होते. परंतु, तरीही चीनी व्हायरसची दुसरी लाट येण्याच्या भीतीने राज्य सरकारने 13 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी (कर्फ्यू) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री 11 ते सकाळी सहा वाजता या वेळेत ही संचारबंदी लागू असेल. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हॉटेल व्यावसायिक नाराज झाले आहेत.
hotel businessman sharad pawar uddhav thackeray news
हे हॉटेल व्यावसायिक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. निबंर्धांमुळे अगोदरच हॉटेल व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. आता ख्रिसमस आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला हॉटेल्समध्ये पुन्हा पहिल्यासारखी वर्दळ पाहायला मिळण्याची शक्यता होती. मात्र, राज्य सरकारच्या नाईट कर्फ्युच्या निर्णयामुळे या अपेक्षांवर पाणी पडले आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.