वृत्तसंस्था
नवी दिल्ली – केंद्र सरकारने सुवर्ण व्यावसायिकांवर सोन्याचे हॉलमार्क दागिने विक्री बंधनकारक केली आहे. सोन्याच्या दागिन्यांवर शुध्दतेचा मार्क हॉलमार्क बंधनकारक करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे सुवर्ण व्यावसायिकांनी स्वागत केले असून बिगर हॉलमार्क दागिने विक्री करण्यासाठी मुदत देखील वाढवून मागितली आहे. Govt of India makes hallmarking on gold jewellery & other gold items mandatory from today
सोन्याची शुध्दता पारखून त्यावर हॉलमार्कचे शिक्कामोर्तब करण्यात येते. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक टळते. दागिने देशभर कोठेही मोडीत काढले तरी त्याच्या शुध्दतेबाबत कोणतीही शंका घेतली जाऊ शकत नाही.
केंद्र सरकारच्या या निर्णयाचे दिल्ली, मुंबई आणि अन्य शहरांमधील सुवर्ण व्यावसायिकांच्या संघटनांनी स्वागत केले आहे. सुवर्णकारांचा व्यवसाय विश्वासावर चालतो. शिवाय सध्याही हॉलमार्कशिवाय दागिने तयार आहेत. ग्राहकांचा कल असे दागिने खरेदी करण्याकडे देखील असतो. त्यामध्ये दराचा देखील फरक राहतो. त्यामुळे बिगर हॉलमार्क दागिने विक्रीसाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी काही सुवर्ण व्यावसायिक संघटनांनी केली आहे.
जुने दागिने खरेदी – विक्रीसाठी परवानी राहणार आहेच. पण त्याचे हॉलमार्किंग करण्याची जबाबदारी संबंधित सुवर्ण व्यावसायिकाची राहील. नवीन दागिने घडविताना हॉलमार्क गुणवत्ता राखण्याची देखील जबाबदारी सुवर्ण व्यावसायिकाची राहील, असे भारतीय मानक ब्युरोचे महासंचालक प्रमोदकुमार तिवारी यांनी सांगितले.
Govt of India makes hallmarking on gold jewellery & other gold items mandatory from today
महत्त्वाच्या बातम्या
- कोव्हिशील्डच्या दोन डोसमधील शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानंतरच वाढवले, आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
- अभिनेता सोनू सूद, काँग्रेस आमदार सिद्दिकींच्या अडचणीत वाढ, कोरोना औषधासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश
- जळगावची GI प्रमाणित केळी दुबईला, वर्षभरात भारताची 619 कोटी रुपयांची 1.91 लाख टन केळी निर्यात