वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मोदी सरकारने अर्थव्यवस्थेतील GDP ची व्याख्याच बदलून टाकली आहे. त्यांनी देशाचा GDP वाढवला आहे म्हणजे गॅस – डिझेल – पेट्रोल यांच्या दरांमध्ये प्रचंड वाढ केली आहे. मोदी म्हणतात जीडीपी वाढवून 23 लाख कोटी रुपये गोळा केले. मग ते गेले कुठे?* अशी घणाघाती टीका काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी आज मोदी सरकारवर केली आहे. GDP means An Increase In The Price Of Gas Diesel Petrol Rahul Gandhi Criticism Of Modi Government
स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ जनतेवर अन्याय असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की मोदी सरकार प्रत्येकाला लुटण्यात व्यस्त आहे पण आता संपूर्ण देश या लुटीच्या विरोधात एकत्र येत आहे. GDP त वाढ म्हणजे Gas, Diesel, Petrol च्या किमतीत वाढ आहे.
आम्ही सरकारमधून बाहेर पडलो तेव्हा व आताच्या पेट्रोलच्या दरात ४२ % वाढ झाली आहे. गॅसच्या दरात ११६% वाढ झाली आहे तर पेट्रोलचे दर ४२% व डिझेलचे दर ५५% इतके प्रचंड वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा भाव १०५ डॉलर होता. जो आता ७१ रुपये झाला म्हणजे कच्च्या तेलाच्या भावात वास्तवात ३२% घट झाली आहे. गॅसच्या किमतीत २६% घट झाली आहे. पण नागरिकांना मिळणाऱ्या गॅसच्या किमतीत मात्र ११६% वाढ झाली आहे.
२३ लाख कोटी रुपये गेले कुठे?
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या व गॅसच्या किमतीमध्ये २०१४ च्या तुलनेत घटच झाली, परंतु प्रत्यक्षात मात्र पेट्रोल. डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत मात्र भरमसाठ वाढ करून मोदी सरकारनै तब्बल २३ लाख कोटी रुपये जनतेच्या खिशातून गोळा केले आहेत, ते गेले कुठे? असा सवाल राहुल गांधींनी केला आहे.
पंतप्रधान मोदींनी हे मान्य करायला हवं की १९९० च्या प्रमाणेच आताही यंत्रणा अपयशी ठरली असून त्यात बदल करण्याची गरज आहे. आम्हाला ते लक्षात आल्यावर १९९० मध्ये आम्ही ते मान्य केले होते. १९९० ते २०१२ या काळात यंत्रणेमध्ये सुधारणा केल्या. मोदींनीही ते मान्य करून आणि यंत्रणेमध्ये मूलगामी सुधारणा कराव्यात. जर पंतप्रधानांना व अर्थमंत्र्यांना त्यांचे सल्लागार योग्य मार्ग दाखवत नसतील तर त्यांनी आमच्याकडे यावं. काँग्रेस पक्षाला अशी परिस्थिती हाताळण्याचा अनुभव आहे आणि आमचे सल्लागार योग्य ते मार्गदर्शन करतील अशी टिप्पणीही त्यांनी केली.
GDP means An Increase In The Price Of Gas Diesel Petrol Rahul Gandhi Criticism Of Modi Government