• Download App
    कॉंग्रेसच्या निवडणूक प्रक्रियेची मजेदार पोलखोल, चक्क भाजप नेत्याला बनविले महासचिव | The Focus India

    कॉंग्रेसच्या निवडणूक प्रक्रियेची मजेदार पोलखोल, चक्क भाजप नेत्याला बनविले महासचिव

    लोकशाही पध्दतीने निवडणुका घेण्याचा कितीही दावा कॉंग्रेस करत असली तरी निवडणूक प्रक्रिया कशा पध्दतीने राबविली जाते याची पोलखोल मध्य प्रदेशात झाली आहे. येथील जबलपूर जिल्ह्यातील युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीत चक्क भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याची महासचिव म्हणून निवड झाली.

    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ : लोकशाही पध्दतीने निवडणुका घेण्याचा कितीही दावा कॉंग्रेस करत असली तरी निवडणूक प्रक्रिया कशा पध्दतीने राबविली जाते याची मजेदार पोलखोल मध्य प्रदेशात झाली आहे. येथील जबलपूर जिल्ह्यातील युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीत चक्क भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याची महासचिव म्हणून निवड झाली. Funny Congress election process, made BJP leader general secretary

    मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील युवक कॉंग्रेसच्या महासचिवपदी हर्षित सिंघाई यांची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर सिंघाई यांना अभिनंदनाचे फोन येऊ लागले. परंतु, प्रत्यक्षात त्यांनी नऊ महिन्यांपूर्वीच ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत कॉंग्रेस सोडली होती. त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

    Funny Congress election process, made BJP leader general secretary

    युवक कॉंग्रेसच्या कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया मार्च महिन्यात सुरू झाली होती. त्यानंतर ऑनलाईन मतदान झाले. सिंघाई यांना अठराशे मतेही मिळाली. परंतु, मार्च महिन्यात त्यांनी पक्षत्याग केला असतानाही कोणा नेत्याच्या किंवा कार्यकर्त्याच्या लक्षात कसे आले नाही, असा सवाल केला जात आहे. त्यामुळे या निवडणूक प्रक्रियेवरच संशय व्यक्त केला जात आहे.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…