वृत्तसंस्था
नवी दिल्ली – भारताशी झालेल्या राफेल फायटर जेटच्या निर्यात व्यवहाराची फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यावर काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी फक्त ३ शब्दांचे ट्विट केले आहे… चोर की दाढी… France Inquiry Into Rafale Deal Revives Political Controversy In India, rahul gandhi reacts sharply
३६ राफेल फायटर जेटच्या झालेल्या व्यवहाराची आता फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवरून राहुल गांधी यांनी “चोर की दाढी…” एवढे तीन शब्दच ट्विट केले आहेत. याशिवाय, या ट्वीटमध्ये राहुल गांधींनी #RafaleScam असा हॅशटॅग देखील राहुल गांधींनी दिला आहे.
फ्रान्समधील Mediapart या शोध पत्रकारिता संकेतस्थळाने राफेल कराराची चौकशी करण्यासाठी न्यायाधीशांची नियुक्ती केल्याची बातमी दिली आहे. ही चौकशी ‘संवेदनशील’ म्हटली गेली असून या ५९ हजार कोटींच्या करारामध्ये झालेल्या सर्व घडामोडींची चौकशी करण्यात येणार आहे. फ्रेंच पब्लिक प्रॉसिक्युशन सर्विसेसच्या आर्थिक गुन्हे विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार गेल्या महिन्यात १४ जून रोजी हा तपास पुन्हा सुरू करण्यात आला. त्या आधारावर आता ही चौकशी सुरू करण्यात येणार असल्याची बातमी मीडियापार्ट संकेतस्थळाने दिली आहे.
दोन वर्षांपूर्वी २०१९ मध्ये पीएनएफच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी या कराराला क्लीनचिट दिली होती. मात्र, आता त्याच अधिकाऱ्याचा कनिष्ठ अधिकारी पीएनएफचा प्रमुख झाला असून त्याने ही चौकशी सुरू करण्याच मंजुरी दिली आहे.