• Download App
    एमपीएससी उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्याने पुण्यात तरुणाची आत्महत्या । Pune youth commits suicide because unemployment after MPSC passing

    पुणे हादरले! एमपीएससीची पूर्व- मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरीअभावी फुरसुंगीत तरुणाची आत्महत्या

    Pune youth commits suicide : राज्यात कोरोना महामारीमुळे अनेक उद्योगधंद्यांवर परिणाम झाला आहे, अनेकांचा रोजगार हिरावला आहे. अशा परिस्थितीत सरकारी भरती परीक्षाही लांबणीवर गेल्या आहेत. परंतु 2019 मध्ये एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्याच्या नैराश्यातून एका तरुणाने पुण्यात आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत ‘दै. सकाळ’ने सविस्तर वृत्त दिले आहे. Pune youth commits suicide because unemployment after MPSC passing


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : राज्यात कोरोना महामारीमुळे अनेक उद्योगधंद्यांवर परिणाम झाला आहे, अनेकांचा रोजगार हिरावला आहे. अशा परिस्थितीत सरकारी भरती परीक्षाही लांबणीवर गेल्या आहेत. परंतु 2019 मध्ये एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्याच्या नैराश्यातून एका तरुणाने पुण्यात आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत ‘दै. सकाळ’ने सविस्तर वृत्त दिले आहे.

    पूर्व – मुख्य परीक्षा उत्तीर्ण, मुलाखतच झाली नाही

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व व मुख्य परीक्षा 2019 मध्ये उत्तीर्ण करणाऱ्या स्वप्नील सुनील लोणकर (वय 24, रा. गंगानगर, फुरसुंगी) यांनी नोकरी नसल्याने व आर्थिक परिस्थितीमुळे आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ही घटना बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास फुरसुंगीतील गंगानगरमध्ये घडली.

    आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी

    मृत स्वप्नीलचे वडील सुनील लोणकर यांचा छोटा प्रिटिंग प्रेसचा व्यवसाय आहे. पत्नीसह ते प्रेसचे काम पाहतात. स्वप्नीलने सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली होती. इंजिनिअरिंगनंतर स्वप्निलने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली होती. 2019च्या पूर्व व मुख्य परीक्षेत तो उत्तीर्ण झाला, परंतु दीड वर्षापासून त्याची मुलाखत झाली नव्हती. 2020 मध्येही त्याने एमपीएससीची परीक्षा दिली. यावेळी तो पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाला. परंतु कोरोनामुळे मुख्य परीक्षा होऊ शकली नाही. या सर्व तणावातूनच त्यान टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठीही लिहून ठेवली आहे.

    बुधवारी सकाळीच स्वप्नीलचे आई-वडील नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. दुपारी साडेचार वाजता त्यांची मुलगी घरी आल्यावर तिला स्वप्नीलने खोलीमध्ये गळफास घेतल्याचे दिसले. तिने आई-वडिलांना ताबडतोब याची माहिती दिली. स्वप्नीलला रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

    Pune youth commits suicide because unemployment after MPSC passing

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    ‘ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’