नाशिक : Donald Trump अमेरिकेने इराणशी केलेल्या करारावर अमेरिकेतल्याच विरोधी पक्षांनी म्हणजेच डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले असतानाच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र अमेरिका इराण यांच्यातल्या कराराचे समर्थन करण्यासाठी G7 या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मंचाचा वापर केला.Donald Trump
G7 या प्रगत राष्ट्रांच्या संघटनेच्या प्रमुखांची बैठक फ्रान्स मधल्या इव्हान मध्ये सुरू झाली. त्यामध्ये भाग घेण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, इटली कॅनडा आणि जपान या देशांचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष पोहोचले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्युअल मॅक्रोन G7 च्या
या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण दिल्याने ते तिथे उपस्थित राहिले. अन्य काही देशांचे प्रमुख सुद्धा निमंत्रित असल्याने ते G7 च्या बैठकीला उपस्थित राहिले त्याचबरोबर सर्व नेत्यांनी सर्व नेत्यांशी द्विपक्षीय वाटाघाटी सुद्धा केल्या.Donald Trump
– स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी वापर
पण डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र G7 या प्रगत राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या व्यासपीठाचा वापर स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठीच केला. अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धानंतर दोन्ही देशांनी करार केला. पण हा 2015 चा अणू करार असल्याची टीका अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतून वेगवेगळ्या टीकेचा भडीमार झाला. अमेरिका इराण पुढे झुकली. इराणशी युद्ध करून अमेरिकेच्या हाताशी काहीच लागले नाही. उलट अमेरिकेला जुनाच करार नव्याने करावा लागला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने इराणचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळला, या आणि अशा स्वरूपाच्या टीकेला डोनाल्ड ट्रम्प यांना सामोरे जावे लागले.
– अमेरिका – इराण कराराची भलामण
त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी G7 च्या बैठकीला उपस्थित असलेल्या प्रत्येक प्रमुख नेत्याशी संवाद साधताना अमेरिका आणि इराण यांच्यातल्या कराराची भलामण केली. मी शंभर टक्के सांगतो इराण इथून पुढे अण्वस्त्र विकसित करणार नाही. त्यामुळेच आम्ही त्यांच्याशी करार केला. इराण पासून आता जगाला धोका नाही. कारण अमेरिकेने त्यांना धडा शिकविला असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी G7 च्या बैठकीला उपस्थित असलेल्या प्रत्येक प्रमुख नेत्याशी संवाद साधताना केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्सच्या भूमीवरून अमेरिकेतल्या टीकाकारांना गप्प करायचा प्रयत्न केला. पण अमेरिकेतले त्यांचे टीकाकार गप्प बसले नाहीत. बराक ओबामा यांनी केलेल्या टीकेला अमेरिकेतून भरपूर प्रतिसाद मिळाला.
Donald Trump uses the G7 platform to pat himself on the back over the deal with Iran!!
महत्वाच्या बातम्या
- MMRD मधल्या वाहतूक व्यवस्थित क्रांतिकारी बदल; कांजूरमार्ग – बदलापूर मेट्रो 14 प्रकल्पाला मोठी गती!!
- NEO : मस्क यांच्या न्यूरालिंकपेक्षा पुढे गेला चीन:जगातील पहिल्या व्यावसायिक ब्रेन चिप ‘NEO’ ला मंजुरी मिळाली; क्लिनिकल चाचणी यशस्वी
- CJP : अभिजीत दिपके वर “प्रयोग केजरीवाल “; जयपूरच्या आंदोलनात कानाखाली जाळ!!
- US-Iran Deal : द फोकस एक्सप्लेनर: US-इराण डीलने बदलणार जगाचे चित्र? होर्मुझ खुला, तेल स्वस्त, निर्बंध हटणार; जाणून घ्या 14 अटी