• Download App
    वा! पाकिस्तानचा दहशतवाद उघड केला म्हणजे असहिष्णुता, ब्रिटीश ब्रॉडकास्टींग रेग्यूलेटर्सनी 'रिपब्लिकन भारत'ला केला २० लाख रुपये दंड | The Focus India

    वा! पाकिस्तानचा दहशतवाद उघड केला म्हणजे असहिष्णुता, ब्रिटीश ब्रॉडकास्टींग रेग्यूलेटर्सनी ‘रिपब्लिकन भारत’ला केला २० लाख रुपये दंड

    पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया उघड करत ‘पाकी’ हा शब्द वापरल्याने रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीला ब्रिटीश ब्रॉडकास्टींग रेग्यूलेटर ऑफकॉमने २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. पाकिस्तानबाबत असहिष्णू भाषा वापरल्याचा आरोप रिपब्लिकन भारत या वृत्तवाहिनीवर करण्यात आला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया उघड करत ‘पाकी’ हा शब्द वापरल्याने रिपब्लिकन भारत या वृत्तवाहिनीला ब्रिटीश ब्रॉडकास्टींग रेग्यूलेटर ऑफकॉमने २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. पाकिस्तानबाबत असहिष्णू भाषा वापरल्याचा आरोप रिपब्लिक भारत चँनेलवर करण्यात आला आहे. British Broadcasting Regulators fine Republican India Rs 20 lakh

    रिपब्लिक भारत या चॅनलवर ६ सप्टेंबर २०१९ रोजी पूछता है भारत, हा अर्णब गोस्वामी यांचा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात भारताच्या अवकाश मोहीमेच्या यशाची चर्चा करताना पाकिस्तान मात्र विकासाच्या बाबत कसा मागे पडला हे सांगितले होते. त्याचबरोबर भारतातील अनेक दहशतवादी घटनांमध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे म्हटले होते. यावेळी पाकी हा शब्द वापरला होता. मात्र, ब्रिटीश ब्रॉडकास्टींग रेग्यूलेटरला हे सगळे पाकिस्तानबाबत द्वेषमूलक वाटले. पाकिस्तानी नागरिकांबाबत असहिष्णुता दर्शवणारी ही चर्चा वाटली. त्यामुळे रिपब्लिक भारत या न्यूज चॅनेलच्या पाकिस्तानी प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या. म्हणून ब्रिटीश ब्रॉडकास्टींग रेग्यूलेटर्सनी रिपब्लिक भारतला २० हजार पौंड म्हणजे सुमारे २० लाख रुपये दंड ठोठावला.

    त्याचबरोबर या कार्यक्रमात वापरण्यात आलेला पाकी हाा शब्द रेसिस्ट वाटला आणि त्यामुळे इंग्लंडमधील प्रेक्षकांना तो आवडला नाही असेही म्हटले गेले आहे. ब्रिटीश ब्रॉडकास्टींग रेग्यूलेटसेनी म्हटले आहे की ही चर्चा पाकिस्ताबाबत आक्रमक भाषा वापरणारी, द्वेषमूलक आणि एखाद्या समुहाबाबत अपमानजनक आहे. त्यासाठी रिपब्लिक भारतने जाहीर माफी मागावी असेही म्हटले आहे.

    British Broadcasting Regulators fine Republican India Rs 20 lakh

    रिपब्लिक भारतने याबाबत म्हटले आहे की हे चॅनल दहशतवाद किंवा द्वेषमूलक भावना पसरविण्याचा कधीही प्रयत्न करत नाही. पाकी हा शब्द सर्वसामान्यपणे पाकिस्तानी नागरिकांसाठी वापरला जातो. त्याचबरोबर पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी कारवाया उघड केल्या होत्या.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…