• Download App
    ओबीसी आरक्षणाचा पुळका की पुन्हा ईडीची धास्ती, भुजबळ काका पुतणे फडणवीसांच्या दारात Bhujbal at the door of Fadnavis, OBC reservation or fear of ED again

    ओबीसी आरक्षणाचा पुळका की पुन्हा ईडीची धास्ती, भुजबळ काका पुतणे फडणवीसांच्या दारात

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी जामीनावर सुटलेले राज्याचे अन्न आणि नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ओबीसी आरक्षणासाठी ही भेट असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात असले तरी पुन्हा ईडीच्या कारवाईच्या धास्तीने ही भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. Bhujbal at the door of Fadnavis, OBC reservation or fear of ED again



    भुजबळ आणि फडणवीस यांच्यामध्ये ओबीसी आरक्षणावरुण बराच अनेक वेळ चर्चा झाली. फडणवीस म्हणाले, ओबीसी आरक्षणप्रश्नी मला आज भुजबळ भेटले,मी त्यांना पुढाकार घेण्यास सांगितले,तुम्ही पुढाकार घ्या आवश्यक ती सर्व मदत करेल. मराठा आरक्षणाच्या वेळेस आम्ही एम्पिरिकल डाटा गोळा केला होता. तो सुप्रीम कोर्टानेही मान्य केला. फेब्रवारी पर्यत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. हा प्रश्न राज्याअंतर्गत सुटण्यासारखा आहे, त्यामुळे आम्ही भुजबळ यांना नेतृत्व करणास सांगत आहोत.

    राजकीय सभ्यता पाळत फडणविस यांनी ही भेट ओबीसी आरक्षणासाठी असल्याचे म्हटले असले तरी राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा आहे.महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स आदी प्रकरणांत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल असलेल्या तीन गुन्ह्य़ांप्रकरणी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना सक्तवसुली महासंचालनालयाकडून(ईडी) अटक करण्यात आली होती. त्यांचे पुतणे समीर यांनाही अटक झाली होती.सुमारे दीड वर्ष छगन भुजबळ तुरुंगात होते.

    Bhujbal at the door of Fadnavis, OBC reservation or fear of ED again

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    पुरोगामी महाराष्ट्राच्या नुसत्याच तोंडी वाफा; दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी घरात काढल्या झोपा!!; वाचा मतदानाचा आकडा!!