वृत्तसंस्था
नवी दिल्ली – काँग्रेसचे वायनाडचे खासदार आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना पुन्हा एकदा काँग्रेसच्या अध्यक्षपदी स्थापित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. युवक काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीत त्यासंबंधीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. At its national executive meeting Indian Youth Congress passes a resolution for Congress party leader Rahul Gandhi
राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणूकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर गेली सव्वा दोन वर्षे सोनिया गांधी याच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदावर आहेत.
राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्षपदी यावे यासाठी काँग्रेसचे अनेक निष्ठावंत नेते प्रयत्न करीत आहेत. पण कपिल सिब्बल, आनंद शर्मा यांच्या सारखे जी – २३ गटाचे नेते गांधी परिवारा व्यतिरिक्त काँग्रेस नेत्याने अध्यक्षपद संभाळावे या मताचे आहेत. त्यांनी सोनिया गांधींना तसे पत्र लिहून आता वर्ष होत आले आहे. या पैकी अनेक नेते अनेकदा तशी जाहीरपणे इच्छा देखील व्यक्त करताना दिसतात.
या राजकीय पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदासाठीचा अनुकूल ठराव करून घेऊन पक्षातल्या जुन्या जी – २३ नेत्यांच्या गटालाच एक प्रकारे आव्हान देण्यात आल्याचे मानण्यात येत आहे.
अर्थात राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनी या मुद्द्यावर अद्याप कोणते भाष्य केलेले समोर आलेले नाही. पण पक्षातले तरूण नेते राहुल गांधींच्या बाजूने उभे राहिल्याचे चित्र या निमित्ताने काँग्रेसमधल्या गांधीनिष्ठ नेत्यांनी करायला सुरूवात केल्याचे स्पष्ट झाले आहे.
At its national executive meeting Indian Youth Congress passes a resolution for Congress party leader Rahul Gandhi
महत्त्वाच्या बातम्या
- BOM Recruitment 2021 : पदवीधर तरुणांना बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज
- मोठी बातमी : DCGIची कोरोनावरील प्रभावी औषध TOCIRA ला मंजुरी, व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांसाठीही वापरता येईल
- पवार – वळसे यांच्या कार्यक्रमांना गर्दी; मुख्यमंत्र्यांची तंबी; आता राष्ट्रवादीला गर्दी टाळण्याची उपरती
- थलायवीची वाट पाहत असलेल्या कंगना राणावतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, नेटफ्लिक्सवर ‘या’ दिवशी हिंदीमध्ये प्रदर्शित होणार
- भारतातील दिल्ली, मुंबई ही शहरे सुरक्षित; जगातील सुरक्षित शहरांच्या यादीत समावेश