• Download App
    नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास झाला सुरु ; दोन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यताArabian sea in konkan and central maharashtra chance of thunderstorms

    नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास झाला सुरु ; दोन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता

    वृत्तसंस्था

    पुणे : अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांमुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाची शक्यता आहे, मात्र त्यानंतर पाऊस विश्रांती घेणार आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे राज्यातून परतण्यासाठी अनुकूल स्थिती असून बहुतांश भागातून मोसमी वारे माघारी परततील, असे हवामान विभागाने स्पष्ट केले. Arabian sea in konkan and central maharashtra chance of thunderstorms

    अरबी समुद्रातील वाऱ्यांमुळे राज्याच्या काही भागांत विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी विजाही कोसळल्या आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात दोन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. त्यामुळे दोन दिवसांनंतर पाऊस विश्रांती घेणार आहे.

    आज-उद्या पाऊस पडणार

    कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, नगर, सोलापूर आदी जिल्ह्यांत ११ ऑक्टोबरपर्यंत, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांत ११ आणि १२ ऑक्टोबरला पावसाची शक्यता आहे.

    Arabian sea in konkan and central maharashtra chance of thunderstorms

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    CJP आंदोलनाच्या शेपटला लटकले विरोधक; संजय राऊतांच्या तोंडून आले “राजकीय सत्य” बाहेर; दिपकेचे आंदोलन विरोधी पक्षांनी ताब्यात घ्यायची भाषा!!

    कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने खाल्ली विरोधकांची अख्खी political space; विरोधकांचे आंदोलनही विस्कळीत!!

    नीट पुनर्परीक्षा झाली, निकालही आला, तरीही जंतर-मंतरवर काँग्रेस जनता पार्टीचे आंदोलन; पण केरळच्या पेपर फुटीकडे लक्ष सुद्धा नाही!!