• Download App
    सोनिया गांधींचे विधान निंदनीय : नड्डा | The Focus India

    सोनिया गांधींचे विधान निंदनीय : नड्डा

    विशेष  प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनाशी १३० कोटी जनता लढत असताना कॉग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचे लॉकडाऊन तयारीशिवाय करण्यात आलेले विधान निंदनीय आहे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी रात्री केली. पंजाब, राजस्थान या सारख्या सहा राज्यांमध्ये आधीच लॉकडाऊन केले होते. तेथे काँग्रेस सरकारे आहेत. तेथे तयारी शिवाय लॉकडाऊन करण्यात आले, असे सोनिया गांधींचे मत आहे का? असा सवाल नड्डा यांनी उपस्थित केला. WHO ने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विविध उपाययोजनांची प्रशंसा केली आहे. अन्य देशांना भारताचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवत सर्व देशांमध्ये गरीबांसाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. अशा स्थितीत सोनिया गांधींचे लॉकडाऊन वरील विधान काँग्रेसच्या संकुचित राजकारणाची मनोवृत्तीच सांगते. आपण अशा प्रकारच्या संकुचित राजकारणापासून दूर राहात कोरोना विरोधात लढाई एकजुटीने केली पाहिजे, असे आवाहन नड्डा यांनी केले.

    Related posts

    सुप्रिया सुळेंनी ओपन चॅलेंज स्वीकारताच, फडणवीसांनी “हे” सांगून डिवचले!!

    माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे, राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांचे आवाहन

    TCS कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात फरार निदा खानाला दिलासा द्यायला नाशिक कोर्टाचा नकार; अटकपूर्व जामिनाच्या विषयावर 27 एप्रिलला सुनावणी