• Download App
    शहरात राहणार्‍यानी गावाकडे पळू नये-बाळासाहेब थोरातांचे आवाहन | The Focus India

    शहरात राहणार्‍यानी गावाकडे पळू नये-बाळासाहेब थोरातांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी 
    मुंबई : शहरातील काही नागरिक गावाकडे निघालेत. ही धावपळ, पळापळ कशासाठी? तुम्ही जेथे आहात तिथेच सुरक्षित राहा, असे आवाहन महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
    तुम्हाला जीवनावश्यक सुविधा पुरवायला शासन कटिबद्ध आहे. यातून नवे वाद होतील, प्रशासनावर ताण निर्माण होईल. माझी विनंती आहे आपण धावपळ करून गावाकडे जाण्याचा प्रयत्न टाळावा, असे थोरात यांनी सांगितले.
    ते म्हणाले की, शहरातील नागरिक गावाकडे आल्याने काही ठिकाणी वादाची परिस्थिती निर्माण होतेय. गावकरी बांधवांना माझी विनंती आहे आपण काळजी घ्या मात्र कायदा हातात घेऊ नका, पोलिसांचे काम पोलिसांना करू द्या!

    Related posts

    पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्येच अडकल्याची टीका झाल्यानंतर अजितदादांना जाग, महाराष्ट्रात अजून दोन – चार ठिकाणी फिरणार शेवटच्या टप्प्यात!!

    पुण्यात दिसले बदललेले राजकीय रंग; पुणेरी पगडी घालून अजितदादा प्रचारात सामील!!

    ठाकरे बंधू बसले अजूनही घरी; एकनाथ शिंदे यांची मात्र नाशिक पाठोपाठ विदर्भात मुशाफिरी!!