वृत्तसंस्था
डेहराडून : पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पुरावे मागणाऱ्या काँग्रेसवर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले, “ राहुल गांधी हे राजीव यांचे पुत्र असल्याचा आम्ही पुरावा मागितला का?”लष्करात सेवा बजावलेल्या उत्तराखंडच्या सुपुत्रावर तुमचा विश्वास नाही का, असा सवालही त्यांनी केला. Why are you asking for proof of surgical strike on Pakistan, Are you Son of Rajivji, had we ask the proof? Hemant Biswa Sharma attacks on Congress
उत्तराखंडमध्ये १४ फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी काँग्रेसवर अनेक प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधींनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितल्याबाबत ते म्हणाले, देशाचा अभिमान, जनरल विपिन रावत यांच्या नेतृत्वाखाली लष्कराने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केले.
“तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही? याचा पुरावा आम्ही कधी तुमच्याकडे मागितला आहे का? आमच्या सैनिकांकडे पुरावे मागण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. आपल्या देशाच्या लष्कराने पाकिस्तानात बॉम्ब फोडला, असे म्हटले तर ते फोडलेच आहेत,” असे हेमंत बिस्वा शर्मा म्हणाले.
Why are you asking for proof of surgical strike on Pakistan, Are you Son of Rajivji, had we ask the proof? Hemant Biswa Sharma attacks on Congress
महत्त्वाच्या बातम्या
- मुद्रांक व नोंदणी विभागाच्या सब रजिस्ट्रार ऑफिसचे कामकाज मंदगती
- सिंचन व्यवस्थापनात पाणी वापर संस्थांचा सहभाग महत्वाचा जयंत पाटील यांचे प्रतिपादन
- दिग्दर्शक रवी टंडन यांचे निधन
- SKIN TO SKIN TOUCH CASE : बाल लैंगिक शोषण कायद्याखाली एका पाठोपाठ एक वादग्रस्त निकाल देणाऱ्या न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवल यांचा राजीनामा