विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाबरोबर शय्यासोबत करताना कॉँग्रेसची धर्मनिरपेक्षता कोठे गेली होती असा सवाल पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी केला आहे. त्यामुळे कोण जातीयवादी आहे आणि कोण नाही हे जनताच ठरवेल, असेही कॅप्टन म्हणाले.Where did your secularism go when you went to bed with a communal party like Shiv Sena in Maharashtra? Ca. Allegation of Amarinder Singh
कॅप्टन सिंग यांनी आपल्या नवीन राजकीय पक्षाच्या नावाची घोषणा केली आहे. तत्पूर्वी त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपला पक्षातील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपल्या पत्रात काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला.
अमरिंदर सिंग एक देशभक्त; युतीसाठी भाजप करणार मैत्रीचा हात पुढे
आपल्याला मुख्यमंत्रीपदावरून काढण्यासाठी तुम्ही आणि तुमच्या मुलांनी कट केल्याचा आरोपही कॅ. अमरिंदर सिंग यांनी केला आहे. नवज्योतसिंग सिद्धूंना लगाम घालण्याऐवजी प्रियंका आणि राहुल यांनी त्यांना संरक्षण दिले. काँग्रेस प्रदेशाध्यपदांचीही संधी दिली.
तर आपणही त्याकडे डोळेझाकपणेच पाहिले. काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस हरीश रावत यांनीही सिद्धूंच्या वर्तणुकीला प्रोत्साहन दिले. कदाचित, त्यामुळेच मला ते सर्वाधिक संशयित व्यक्ती वाटतात. पक्षाकडून माझ्यासोबत झालेल्या व्यवहारामुळे मला अतिव दु:ख झाल्याचेही सिंग यांनी आपल्या 7 पानी पत्रात म्हटले आहे.
सिद्धू पंजाबसाठी योग्य व्यक्ती नाही. ते अस्थिर मनाचे आहे. त्यांनी राज्यातल्या कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, तरीही मी त्यांना जिंकू देणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
कॅ. अमरिंदर सिंग यांनी कॉँग्रेसमधील आपल्या जुन्या दिवसांनाही उजाळा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, १९६५ मध्ये भारत-पाकिस्तान युध्दात लढल्यानंतर मी सार्वजनिक जीवनात येण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी माझे वडील भारताचे इटलीतील राजदूत होते तर आई खासदार होत्या.
१९८० साली पहिल्यांदा पतियाळा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलो. त्यावेळी पंजाबमध्ये अस्थिर वातावरण होते. त्यावेळी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी माझ्यावर विश्वासाने संत हरचंद्रसिंग लोंगोवाल यांच्याशी चर्चा करायला सांगितले होते.
Where did your secularism go when you went to bed with a communal party like Shiv Sena in Maharashtra? Ca. Allegation of Amarinder Singh
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान