• Download App
    राहूल गांधी लष्कराबाबत बोलले तेव्हा लोक का पेटून उठले नाहीत, आसामच्या मुख्यमंत्र्यांचा सवाल|When Rahul Gandhi spoke about the army, why didn't people get angry, questioned the Chief Minister of Assam

    राहूल गांधी लष्कराबाबत बोलले तेव्हा लोक का पेटून उठले नाहीत, आसामच्या मुख्यमंत्र्यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राहुल गांधींच्या या वागण्यावर मी त्यांना काही बोललो तर तेलंगणाचे मुख्यमंत्री भडकले. पण जेव्हा राहुल गांधी लष्कराबाबत बोलले होते तेव्हा हे लोक का पेटून उठले नाहीत. या लोकांनी का ट्विट केलं नाही,असा सवाल आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी केला आहे.When Rahul Gandhi spoke about the army, why didn’t people get angry, questioned the Chief Minister of Assam

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्याप्रकरणी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी टीका केली आहे. यावर उत्तर देताना सरमा म्हणाले, एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की लष्कराचा अपमान करणे किंवा त्यांच्याकडे सर्जिकल स्ट्राईकबाबत पुरावा मागणं यापेक्षा मोठा गुन्हा कोणताच असू शकत नाही.



    राहुल गांधींच्या या वागण्यावर मी त्यांना काही बोललो तर तेलंगणाचे मुख्यमंत्री भडकले. पण जेव्हा राहुल गांधी लष्कराबाबत बोलले होते तेव्हा हे लोक का पेटून उठले नाहीत. या लोकांनी का ट्विट केलं नाही. गांधी कुटुंबाला तुम्ही काही बोलू शकत नाही पण बाकी सर्वकाही करता येतं, हे ही मानसिकता देशातून जायला हवी.

    देशाला लोकशाहीवादी व्हावं लागेल, गांधी कुटुंबियांवर देखील टीका करण्याची हिंमत आता देशाला बाळगायला हवी. गांधी कुटुंबानं खुलेपणानं लष्करावर टीका केली, दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्यावरही टीका केली. पण या कुटुंबाला कोणी जबाबदार धरलं नाही. पण भारत आता बदलला आहे आणि इथं गांधी कुटुंबही जबाबदारीच्या परिघात आहे. त्यांनाही विविध गोष्टींना जबाबदार धरता यायला हवे.

    When Rahul Gandhi spoke about the army, why didn’t people get angry, questioned the Chief Minister of Assam

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Arvind Kejriwal : केजरीवाल म्हणाले- न्यायमूर्ती स्वर्णकांतांकडून न्यायाची आशा संपली; त्यांच्या मुलाला केंद्राकडून सर्वाधिक प्रकरणे मिळाली

    पंतप्रधान मोदींची महाराष्ट्राला भेट; काशी आणि अयोध्येचा वाढविला रेल्वे कनेक्ट!!

    AAP Crisis : आपच्या 7 खासदारांच्या भाजपत विलीनीकरणास मंजुरी; राज्यसभेत भाजप खासदार 106 वरून 113 झाले