• Download App
    महाराष्ट्रासह बारा राज्यांत ऑक्सिजनची गरज,५० हजार मेट्रिक टन पुरवठ्यासाठी टेंडर, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची माहिती Twelve states including Maharashtra need oxygen tender for supply of 50,000 metric tons

    पीएमकेअरमधून शंभर रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प; तसेच ५० हजार टन पुरवठ्यासाठी जागतिक टेंडर

    महाराष्ट्रासह बारा राज्यांत कोरोना रुग्णांचे ऑक्सिजनअभावी हाल होत आहेत. उद्योगांचा पुरवठा बंद करूनही रुग्णालयांनाऑक्सिजन पुरेनासा झाला आहे. त्यावर केंद्राने मदत केली असून बारा राज्यांतील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळित करण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. लवकरच याठिकाणचा ऑक्सिजन पुरवठा सुरळित सुरू होईल,अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली. यासाठी ५० हजार मेट्रिक टन मेडीकल ऑक्सिजनची आयात करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्यात येणार आहे. Twelve states including Maharashtra need oxygen tender for supply of 50,000 metric tons


    विशेष प्रतिनिधी 

    मुंबई : महाराष्ट्रासह बारा राज्यांत कोरोना रुग्णांचे ऑक्सिजनअभावी हाल होत आहेत. उद्योगांचा पुरवठा बंद करूनही रुग्णालयांना ऑक्सिजन पुरेनासा झाला आहे. त्यावर केंद्राने मदत केली असून बारा राज्यांतील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळित करण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. लवकरच याठिकाणचा ऑक्सिजन पुरवठा सुरळित सुरू होईल,अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली. यासाठी ५० हजार मेट्रिक टन मेडीकल ऑक्सिजनची आयात करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्यात येणार आहे.

    महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तमीळनाडू, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत आहे. येथील पुरवठ्यासाठीची व्यवस्था केल्याचे डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.

    आरोग्य मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीने ऑक्सिजनचा प्रश्न सोडविण्यासाठी देशातील १०० रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचे प्रेशर स्विंग अ‍ॅबस्पॉर्शन प्लॅँट उभारण्याची सूचना केली आहे. प्रेशर स्विंग अ‍ॅबस्पॉर्शन प्लॅँटमध्ये ऑक्सिजन ची निर्मिती होते. त्यामुळे ही रुग्णालये ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत स्वयंपूर्ण होणार आहेत. त्यामुळे नॅशनल ग्रीडवर येणारा मागणीचा दबाव कमी होते.



    विविध शहरातील रुग्णसंख्याही झपाट्याने वाढतेय. अशावेळी रुग्णालयात बेड्स आणि ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली आहे. कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यावर रुग्ण अस्थस्थ होता. ही लेव्हल जास्त कमी झाली तर प्राणावरही बेतण्याची भीती असते. महाराराष्ट्रातील बहुतेक शहरात ऑक्सिजन अभावी रुग्णांचे हाल होत आहेत. रिलायन्सच्या जामनगर येथील प्रकल्पातून महाराष्ट्राला ऑक्सिजन चा पुरवठा होणार आहे. आता केंद्रानेही मदतीची तयारी दर्शविल्याने ऑक्सिजनचा प्रश्न सुटणार आहे.

    राज्यात सध्या 80 टक्के ऑक्सिजन हा वैद्यकीय वापरासाठी तर 20 टक्के हा उद्योगांसाठी देण्याचे आदेश कंपन्यांना दिले होते. पण त्यात आता लवकरच बदल केले जाणार आहे. आता 100 टक्के ऑक्सिजन हा फक्त वैद्यकीय वापरासाठी देण्याचे आदेश कंपन्यांना दिले आहेत.

    Twelve states including Maharashtra need oxygen tender for supply of 50,000 metric tons

    इतर बातम्या

    Related posts

    PM Modi : द फोकस एक्सप्लेनर : ऑपरेशन सिंदूरनंतर PM मोदी आदमपूरला का गेले? जाणून घ्या, पाकला घाम फोडणाऱ्या एअरबेसबद्दल

    Operation sindoor : मराठ्यांनी 1758 मध्ये अटकेपार लावले झेंडे; त्यानंतर तब्बल 267 वर्षांनी भारताने तिथपर्यंत बॉम्ब आणि ब्राह्मोस पोहोचवले!!

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट