• Download App
    पंतप्रधानांनी सांगितला पाच ऑगस्टचा महिमा...हॉकी मेडल मिळाले, राम मंदिराच्या निर्माणाला सुरूवात झाली आणि काश्मीरमधून कलम ३७० हटले|The Prime Minister said that the glory of 5th August ... Hockey medal received, construction of Ram temple started and Article 370 was removed from Kashmir

    पंतप्रधानांनी सांगितला पाच ऑगस्टचा महिमा…हॉकी मेडल मिळाले, राम मंदिराच्या निर्माणाला सुरूवात झाली आणि काश्मीरमधून कलम ३७० हटले

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताल हॉकी ऑलिम्पिक पदक मिळालं, राम मंदिराच्या निमार्णाच्या कामाला सुरूवात झाली आणि अनुच्छेद ३७० हटवण्यात आली… या तिन्ही गोष्टी एकाच तारखेला म्हणजेच ५ ऑगस्ट रोजी घडल्या… असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५ ऑगस्ट या तारखेचा महिमा सांगितला आहे.The Prime Minister said that the glory of 5th August … Hockey medal received, construction of Ram temple started and Article 370 was removed from Kashmir

    ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने’बद्दल जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. पंतप्रधान म्हणाले, आज ५ ऑगस्ट ही तारीख खूपच विशेष ठरलीय. ही ५ ऑगस्टच तारीख आहे, जेव्हा दोन वर्षांपूर्वी देशानं ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ भावनेला आणखीन सशक्त केलं.



    ५ ऑगस्ट रोजच जम्मू काश्मीरच्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक अधिकार, प्रत्येक सुविधा मिळवून देण्यासाठी अनुच्छेद ३७० हटवण्यात आला… ती ५ ऑगस्ट हीच तारीख आहे जेव्हा कोट्यवधी भारतीयांनी शेकडो वषार्नंतर भव्य राम मंदिर निमार्णाकडे पहिलं पाऊल टाकलं. आज अयोध्येत वेगाने राम मंदिराच्या निमार्णाचं काम सुरू आहे.

    भाजपाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनीही पाच ऑगस्ट हा शुभ दिवस असल्याचे सांगताना म्हटले आहे की, दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी कलम ३७० हटवलं गेलं, गेल्या वर्षी याच दिवशी राम मंदिराचं भूमिपूजन झालं आणि आज पुन्हा एकदा देशात एवढा शुभ दिन आलाय की देशात आनंद आणि उल्हास आहे.

    The Prime Minister said that the glory of 5th August … Hockey medal received, construction of Ram temple started and Article 370 was removed from Kashmir

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य