प्रतिनिधी
नवी दिल्ली : काश्मीरमध्ये 1990 च्या दशकात झालेल्या भयानक नरसंहाराचे वास्तव मांडणारा सिनेमा “द काश्मीर फाईल्स” च्या मुद्द्यावरून भाजप आणि बाकीचे विरोधी पक्ष आमने-सामने आले आहेत. The Kashmir Files: What should I do if someone gets chills !!; Fadnavis pierces Raut
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेने काश्मिरी पंडितांना 5 % आरक्षण दिले होते. या मुद्द्यावरून शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे देखील आमने-सामने आले आहेत.
एखाद्या सिनेमातून सत्य बाहेर आले तर कोणाला काय होते? कोणाला मिरची का लागते?, असा तिखट सवाल देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत विचारला. त्यांचा रोख संजय राऊत यांच्यावर होता. संजय राऊत यांनी सामना अग्रलेख लिहून “द काश्मीर फाईल्स”मध्ये मांडलेले सत्य हे “घडवलेले सत्य” आहे, असा दावा केला आहे.
महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारने तर “द काश्मीर फाइल्स” हा सिनेमा टॅक्स फ्री करण्याची भाजप आमदारांची मागणी फेटाळली आहे.
बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्व
या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता या सिनेमातून मधून जर सत्य पहिल्यांदा बाहेर येत असेल तर कोणाला मिरची का लागावी?, असा तिखट सवाल केला आहे. सध्या संजय राऊत यांच्या पक्षांबरोबर वावरतात, त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला काश्मीर मधले सत्य बाहेर येणे नको आहे.
पण एकेकाळी याच शिवसेना पक्षाच्या प्रमुखांनी काश्मिरी पंडितांना 5 % टक्के आरक्षण दिले होते. काश्मिरी पंडितांविषयी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका प्रखर हिंदुत्वाची होती. पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कच्छपी लागल्याने बदलली आहे, असे शरसंधान देवेंद्र फडणवीस यांनी सोडले.
The Kashmir Files: What should I do if someone gets chills !!; Fadnavis pierces Raut
महत्त्वाच्या बातम्या
- BEED : ज्ञानेश्वरचा झाला मोहम्मद ! मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी पैसे आणि मुस्लिम मुलीशी विवाह लावून देण्याचे आमिष … यूपीतील
- The Kashmir Files – Gujrat Files – Bengal Files : आला फाईल्सचा जमाना; एकेकाची आता खोला…!!
- अमेरिकेनंतर बाेस्टनचे भारतात सर्वात माेठे संशाेधन केंद्र
- The Kashmir Files : गोवा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही “फिल्म जिहाद”, तरी सिनेमाची 60 कोटींची कमाई!!