• Download App
    घराणेशाही वाद्यांनी फक्त आपल्या तिजोऱ्या भरल्या, पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल|The dynastic instruments just filled their coffers, the Prime Minister attacking the opposition

    घराणेशाही वाद्यांनी फक्त आपल्या तिजोऱ्या भरल्या, पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी

    महाराजगंज : घराणेशाही असलेले लोक भारताला समर्थ आणि उत्तर प्रदेश कधीही सक्षम बनवू शकत नाहीत. करोनाच्या काळात या लोकांनी भारताच्या आत्मविश्वासाला धक्का लावण्यात कुठलीही कसर सोडली नाही हे, तुम्ही पाहिले आहे, असा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केला. घराणेशाहीवाद्यांना फक्त आपल्या तिजोऱ्या भरल्या, असा आरोपही त्यांनी केला.The dynastic instruments just filled their coffers, the Prime Minister attacking the opposition

    उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथे बोलताना मोदी म्हणाले, तुम्ही या घोर घराणेशाहीच्या सदस्यांपासून सावध राहा. घराणेशाही असलेल्यांनी ज्या जिल्ह्यांना विकासात मागे ढकलले आहे, आम्हाला त्या जिल्ह्यांसाठी अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. हीच आत्मनिर्भर आणि शक्तिशाली भारताची ताकद आहे.



    पण हे कट्टर घराणेशाहीवाद्यांना भारताला सामर्थ्यवान म्हणून बघायचे नाही, ते काही ना काही अडथळे आणतच राहतात. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना पुन्हा एकदा पराभव पत्करावा लागला आहे.त्यांनी जे केले नाही, तेही आम्ही करत आहोत. महाराजगंज हे देखील याचे उदाहरण आहे. आज नेपाळ सीमेवर रस्त्यांचे जाळे विणले जात आहे.

    मुख्य रस्त्यांचे चौपदरी आणि महामार्गांमध्ये रूपांतर करण्यात येत आहे. कुशीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारल्यानंतर आता येथे पर्यटकांची संख्याही वाढणार आहे. गेल्या दोन वर्षांत वेगाने बदलणारी जागतिक परिस्थिती तुम्ही पाहत आहात. जग सध्या अनेक आव्हानांमधून जात आहे. यापासून कोणीही वाचू शकत नाही. या स्थितीत भारताचे शक्तीशाली होणे अत्यंत गरजेचे आहे.

    प्रत्येक भारतीयाला स्वदेशी लसीवर अभिमान वाटला पाहिजे. पण या घराणेशाही असलेल्यांनी भारतात बनवलेल्या लसीविरुद्ध देशातील गरीबांना चिथावण्याचा प्रयत्न केला. पण जगातील मोठे देश देखील आज लस देण्यात भारतापेक्षा खूप मागे आहेत. भारताने आज आपल्या नागरिकांना पावणे दोनशे कोटी लसीचे डोस मोफत दिले आहेत, असे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले.

    The dynastic instruments just filled their coffers, the Prime Minister attacking the opposition

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Marco Rubio and S Jaishankar : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी एस जयशंकर यांच्याशी केली चर्चा

    Asaduddin Owaisi : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला असदुद्दीन ओवैसींनी सुनावले, म्हणाले..

    Operation Sindoor impact : भारत इथून पुढे दहशतवादाला act of war समजूनच ठोकणार, म्हणजे नेमके काय करणार??