• Download App
    दहशतवादी हल्याचा कट दिल्ली पोलीसांनी उधळून लावला, सहा जणांना अटक, महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशात, दिल्लीत हल्याची योजना|Terrorist plot foiled by Delhi Police, six arrested, plan to attack Delhi, Maharashtra, Uttar Pradesh

    दहशतवादी हल्याचा कट दिल्ली पोलीसांनी उधळून लावला, सहा जणांना अटक, महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशात, दिल्लीत हल्याची योजना

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केलं आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र तसेच दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना होती. या संशयित दहशतवाद्यांना महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आले आहे.Terrorist plot foiled by Delhi Police, six arrested, plan to attack Delhi, Maharashtra, Uttar Pradesh

    अटक करण्यात आलेल्यांपैकी तिघांची नावे जान मोहम्मद शेख ऊर्फ समीर कालिया,ओसामा आणि जिशान अशी आहेत. यातील दोन संशयित दहशतवादी पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन आले आहेत.
    पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या मदतीने दहशतवादी भारतात मोठा बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत होते. त्यासाठी शस्त्रास्त्रे तसेच दारुगोळा जमवत होते.



    मात्र, या घातपातची माहिती दिल्ली पोलीस विशेष कक्षाला तसेच एटीएसला समजली. त्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या एटीएससोबत उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये छापे घातले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दारुगोळा तसेच शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आले आहेत.

    अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील दोन दहशतवादी डी- गँगशी संबंधित असल्याचीही माहिती आहे. सध्या देशात सणांची धूम आहे. गणेशोत्सव, नवरात्री या सणांमुळे देशात अनेक ठिकाणी गर्दी होते. याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोट घडवण्याची दहशतवाद्यांची तयारी होती.

    दिल्ली पोलीस तसे एटीएसने देशातील विविध भागातून एकूण सहा जणांना अटक केले आहे. यामध्ये महाराष्ट्रात राहणाऱ्या एकाला राजस्थानमधील कोटा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांना दिल्ली आणि तीन जणांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. या संशयितांच्या टार्गेटवर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश तसेच दिल्लीमधील काही ठिकाणे होती.

    जान मोहम्मद शेख ऊर्फ समीर कालिया मुंबईतील सायन भागात राहत असून टॅक्सी चालवितो. पत्नी आणि दोन मुलींसोबत तो राहतो. एका मुलीचे पदव्युत्तर शिक्षण झाले असून, दुसरी मुलगी शाळेत शिक्षण घेत आहे. शेख लहानपणापासून येथे राहण्यास आहे.

    Terrorist plot foiled by Delhi Police, six arrested, plan to attack Delhi, Maharashtra, Uttar Pradesh

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य