• Download App
    बंगलोर मध्ये विरोधी ऐक्याच्या बैठकीत सुप्रिया सुळेंच्या गैरहजर; काँग्रेस नेते आणि पवारनिष्ठ माध्यमांनाच दाट संशय!! Supriya Sule absence from opposition unity meeting in Bangalore

    बंगलोर मध्ये विरोधी ऐक्याच्या बैठकीत सुप्रिया सुळेंच्या गैरहजर; काँग्रेस नेते आणि पवारनिष्ठ माध्यमांनाच दाट संशय!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कर्नाटकची राजधानी बंगलोर मध्ये झालेल्या विरोधी ऐक्याच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हजर होते, पण राष्ट्रवादी काँग्रेस कडून मात्र फक्त शरद पवार हजर होते. SSupriya Sule absence from opposition unity meeting in Bangalore

    या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना पत्रकारांशी संवाद साधण्याची “इंडिया”च्या नेत्यांनी संधी जरूर दिली, पण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शरद पवारांना आपल्या शेजारी बसवून देखील त्यांना पत्रकारांशी बोलण्याची संधी मिळाली नाही.

    पण त्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातल्या मराठी पवारनिष्ठ माध्यमांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या गैरहजेरी बद्दल संशय व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या समवेत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत विरोधकांच्या बैठकीला हजर राहतात. तिकडे राजधानी नवी दिल्लीत उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या बैठकीला हजर राहतात, पण विरोधकांच्या बंगलोर मधल्या बैठकीला मात्र खासदार सुप्रिया सुळे शरद पवारांबरोबर हजर राहत नाहीत, हे नेमके काय गौडबंगाल आहे??, असा सवाल पवारनिष्ठ मराठी माध्यमांनी विचारला आहे.

    सुप्रिया सुळे का गेल्या नाहीत??

    वास्तविक सुप्रिया सुळे यांच्याकडे शरद पवारांनी अखंड राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष या नात्याने त्या बंगलोर मधल्या विरोधकांच्या बैठकीला हजर राहणे अपेक्षित होते, असे मराठी माध्यमांनी नमूद केले आहे.


    बारामतीतून अजितदादा आणि सुप्रिया सुळेच येणार निवडून; रोहित पवारांनी उलगडला पवार फॅमिलीचा “सेफ गेम”!!


    सुप्रिया सुळे “वेगळ्या” विचारात??

    पण प्रत्यक्षात सुप्रिया सुळे बैठकीला हजर राहिल्या नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने फक्त शरद पवारच बैठकीला हजर होते. त्यामुळे पवारांना पुतण्या सोडून गेला. आता मुलगीही काही “वेगळ्या” विचारात आहे का??, ती स्वतःची राजकीय सोय बघत आहे का?? असा सवाल पवारनिष्ठ मराठी माध्यमांनी उपस्थित केला आहे.

    ठाकरे यांची लढाई प्रामाणिक

    एकीकडे उद्धव ठाकरेंची भाजपा विरोधातील लढाई तीव्र आणि प्रामाणिक दिसते. कारण त्यांच्या समवेत दरवेळी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हजर असतात. पण पवार मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात “डबल गेम” करतात. ते एकीकडे पुतण्याला भाजप बरोबर सत्तेच्या वळचणीला पाठवून दुसरीकडे आपण विरोधकांच्या बैठकीला हजर राहतात आणि आपल्याबरोबर आपणच नेमलेल्या पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांना बरोबर नेत नाहीत किंवा स्वतः सुप्रिया सुळे देखील त्यांच्याबरोबर जात नाहीत, याविषयी महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी देखील दाट संशय व्यक्त केला आहे.

    पवारांची डबल गेम, काँग्रेसला खात्री

    पवार काँग्रेस बरोबर महाराष्ट्रात राहतील. पण काँग्रेसला फायदा होईल, अशी कोणतीही वर्तणूक करणार नाहीत. कारण पवार जर स्वतः राष्ट्रीय लोकशाही आघाडी बरोबर निघून गेले, तर त्यांची अजितदादांच्या मागे फरफट झाल्याचे “परसेप्शन” महाराष्ट्रात तयार होईल आणि पवारांच्या मूळातच कमी असलेल्या अथवा नसलेल्या राजकीय विश्वासार्हतेला कायमचा धक्का बसेल, असे वक्तव्य वरिष्ठ काँग्रेस नेत्यांने केले आहे. त्यामुळे पवार “डबल गेम” करतात याची काँग्रेस नेत्यांना खात्री आहे.

    पण त्या पलीकडे जाऊन सुप्रिया सुळे देखील पवारांबरोबर विरोधकांच्या बैठकीला उपस्थित नव्हत्या, याविषयी मात्र पवारनिष्ठ मराठी माध्यमे आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते दोन्ही एकाच प्रकारचा दाट संशय व्यक्त करत आहेत.

    Supriya Sule absence from opposition unity meeting in Bangalore

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही