विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी अजब दावा केला आहे. द कश्मीर फाईल्स चित्रपट दहशतवाद्यांचा मोठा कटही असू शकतो. कश्मिरी ब्राह्मणांमध्ये भीती आणि दहशतीचं वातावरण राहावं आणि ते पुन्हा कश्मिरात जाऊ नये म्हणून दहशतवादी संघटना हा चित्रपट दाखवत असावे. चित्रपटाच्या युनिटमधील सर्वांची दहशतवाद्यांशी कनेक्शन असल्याच्या अंगाने चौकशी केली गेली पाहिज, अशी मागणी त्यांनी केली आहे.Strange argument of former Chief Minister of Bihar, connection of terrorists with The Kashmir Files movie
कश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार आणि स्थलांतरावर आधारित द कश्मीर फाईल्स सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाचे राजकीय वतुर्ळातही पडसाद उमटले आहेत. आता भाजपच्या मित्रपक्षाने सिनेमाबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचबरोबर या चित्रपटाशी संबंधित सगळ्यांची दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या अंगाने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असलेल्या या सिनेमावरून राजकारण तापलं आहे. सिनेमाबद्दल उलटसुलट बोललं जात आहे. द कश्मीर फाईल्सवरून दोन गट पडल्याचं दिसत असून, एका गटाकडून सिनेमाचं कौतूक केलं जात आहे, तर दुसरीकडून सिनेमावर टीका होत आहे.
माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी एक ट्विट करून हा गंभीर आरोप केला असून, या ट्विटमुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे जितन राम मांझी यांनी हे ट्विट चित्रपटात भूमिका साकारणाºया अभिनेते अनुपम खेर यांनाही टॅग केलं आहे.
द कश्मीर फाईल्स चित्रपटावरून राजकीय वादंग निर्माण झालेलं असतानाच आज केंद्र सरकारने चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना वाय दजार्ची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता विवेक अग्निहोत्री यांच्याबरोबर सीआरपीएफचे जवान नेहमीसाठी तैनात असतील.
Strange argument of former Chief Minister of Bihar, connection of terrorists with The Kashmir Files movie
महत्त्वाच्या बातम्या
- अमनोरा येथे होळीच्या पार्टीत २१ मोबाईल चोरीला हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- India – Japan – Kishida – Modi : भारतावरचा विश्वास वाढला; जपानची भारतात 3.2 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा!!
- आसनी’ चक्रीवादळामुळे काही ठिकाणी वादळ, पाऊस
- NCP – MIM Alliance : राष्ट्रवादीला आघाडीसाठी फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी!!; नितेश राणेंचा टोला