विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार यांनी भेट घेतल्यानंतर ज्या राजकीय भेटीची अटकळ लावण्यात आली होती, ती भेट आज होणार आहे. शरद पवार हे मोदी यांना भेटल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या भेटीला जाणार आहेत. Sharad pawar to meet amit shah today after meeting with PM narendra modi
सूत्रांच्या हवाल्याने झी 24 तासने ही बातमी दिली आहे. या बैठकीचा अजेंडा एनडीआरएफच्या नियमावलीत बदल, महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त भागांसाठी काही मदतीचा दिलासा असा असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु राजकीय वर्तुळात त्या पलीकडच्या अजेंड्याची जास्त चर्चा आहे. अर्थातच ती महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींशी संबंधित आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा फार्मूला मोडून नवीन काही फॉर्म्युला तयार होतोय का?, याविषयी चर्चा होते आहे. शरद पवार हे अमित शहा यांना भेटून या फॉर्म्युलावर चर्चा करण्याची शक्यता आहे. पवारांच्या बरोबर सुरुवातीला रायगडचे खासदार सुनील तटकरे हे चर्चेत असतील. परंतु नंतर फक्त अमित शहा आणि पवार यांच्यात चर्चा होईल, असे सांगण्यात येत आहे.
५ ऑगस्टपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे दोन्ही नेते दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. चार दिवस ते दिल्लीत विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्याची पार्श्वभूमी शरद पवार यांनी अमित शहा यांची भेट घेण्यामागे आहे. या दोघांच्या भेटीत कोणती “राजकीय खिचडी” शिजते याकडे महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
वरळीतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकास शुभारंभ कार्यक्रमात शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले होते आता अमित शहा यांना भेटून ते कुणाचे कौतुक करतात ते पहायचे आहे.
आज सकाळी काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये बोलाविलेल्या ब्रेकफास्ट मिटींगला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार यांनी हजेरी लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार एकीकडे विरोधकांच्या एकजुटीचा सामील असल्याचे दाखवत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मात्र अमित शहा यांच्या भेटीला जात असल्याने विरोधकांमध्ये देखील चलबिचल आहे.
Sharad pawar to meet amit shah today after meeting with PM narendra modi
महत्त्वाच्या बातम्या
- जाको राखे साईंया …! अन् नाशिकच्या शिवराजला आयुष्य मिळालं ; अमेरिकेत लकी-ड्राॅ – 16 कोटींचं इंजेक्शन मोफत
- Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा राज्य सरकारला फटकारले disaster management authority ला देखील लोकल प्रवासाची परवानगी नाही
- कृष्णा नदी पाणीवाटप वादावर आंध्र – तेलंगणने मध्यस्थीतून तोडगा काढावा, सरन्यायाधिशांची सूचना
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नांना यश, आसाम – मिझोराममधील तणाव निवळण्याची चिन्हे
- पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्याने मेहबूबा मुफ्ती केंद्रावर भडकल्या, काश्मीरींची बाजू घेत टीका