वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना कोरोना झाला आहे. पुण्यातील जहांगीर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी डॉक्टरांना फोन करून राजीव सातव यांच्या प्रकृतीची चौकशी केली.Rajiv Satav’s health deteriorated;Rahul Gandhi’s discussion with doctors in Pune
कोरोनाची लागण झाल्याची माहिती राजीव सातव यांनी ट्विट करून २२ एप्रिलला दिली होती. “सौम्य लक्षणं जाणवल्यानंतर चाचणी केली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. माझ्या संपर्कात आलेल्यानी नियमांचं पालन करावे,” असं आवाहन त्यांनी केले होते.
पुण्यातील जहांगीर रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले आहेत.त्यांची प्रकृती बिघडली असून मुंबईमधील लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमला बोलावले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फोन करुन जहांगीरमधील डॉक्टरांकडे राजीव सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राहुल गांधी आणि डॉक्टरांमध्ये बराच वेळ चर्चा सुरु होती, असे वृत्त आहे.
Rajiv Satav’s health deteriorated;Rahul Gandhi’s discussion with doctors in Pune
महत्त्वाच्या बातम्या
- बनावट इ-पासचा भांडाफोड , हडपसरच्या तरूणाला अटक
- Coronavirus Update : कोरोना चाचणीची मोबाईल लॅब नागपूरमध्ये सुरु ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांना यश
- कोरोना रुग्णासाठी ऑक्सिजनचा वापर वाढतोय, उत्तर प्रदेशातील चित्र ; 29 हजार जणांना कोरोना
- पुण्यात स्कूल बसचे रूपांतर शववाहिकेत ; रूग्णवाहिकांच्या त्रुटींमुळे निर्णय : चालकांना एक वर्षानंतर रोजगार
- परं साधनं नाम वीरव्रतम् ! संवेदना हरवलेल्या समाजासाठी ‘मुर्तिमंत त्याग’ करणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दाभाडकर काकांच्या मुलीची संवेदनशील प्रतिक्रीया