• Download App
    तामिळनाडूत पावसाने घडविली "राजकीय क्रांती"; द्रमुक सरकार अम्मा कॅन्टीन मधून वाटणार मोफत अन्न!! |Rains trigger "political revolution" in Tamil Nadu; DMK government will get free food from Amma canteen

    तामिळनाडूत पावसाने घडविली “राजकीय क्रांती”; द्रमुक सरकार अम्मा कॅन्टीन मधून वाटणार मोफत अन्न!!

    वृत्तसंस्था

    चेन्नई : मान्सून संपताना त्याने तामिळनाडूत एक विशिष्ट “राजकीय क्रांती” घडविली आहे तामिळनाडूचे प्रमुख सरकार चक्क अण्णा द्रमुकने सुरू केलेल्या अम्मा कॅन्टीन या योजनेद्वारे तामिळनाडूतल्या जनतेला मोफत अन्न वाटप करणार आहे.Rains trigger “political revolution” in Tamil Nadu; DMK government will get free food from Amma canteen

    तामिळनाडूत विषेशत: चेन्नई, मदुराई यासारख्या मोठ्या शहरांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तिथल्या घराघरांमध्ये पाणी शिरून अक्षरश: चिखल झाला आहे. तामिळनाडूतल्या एम. के. स्टॅलिन यांच्या द्रमुक सरकारने केंद्राच्या मदतीने पाऊसग्रस्तांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत.



    मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन स्वतः विविध शहरांचा आणि किनारपट्टीवरचा दौरा करत आहेत. तेथे सरकारतर्फे आणि द्रमुक पक्षातर्फे विविध ठिकाणी मोफत अन्न वाटपाचे कार्यक्रम सुरू आहेत. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले जात आहे. एनडीआरएफच्या टीम कार्यरत आहेत. या पार्श्‍वभूमीवर आज एम. के. स्टॅलिन यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जोपर्यंत तामिळनाडूतला मान्सून संपत नाही तोपर्यंत अम्मा कॅन्टीन मधून जनतेला मोफत अन्न वाटप करण्यात येईल, अशी ती घोषणा आहे.

    ही घोषणा मूळातच “क्रांतिकारक” आहे. कारण आत्तापर्यंत तामिळनाडूतील द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांचे राजकीय वैर इतक्या टोकाला पोहोचलेले आहे की ते एकमेकांच्या कोणत्याही योजना पुढे चालवताना दिसत नाहीत. योजना गरीब कल्याणाच्या असतात पण ते कधीही एकमेकांच्या नावांचा वापर त्यासाठी करत नाहीत. दोन्ही पक्ष गरीब कल्याण योजना राबविण्यात आघाडीवर असतात. पण ते स्वतःच्या नेत्यांच्या नावाचा वापर करून…!!

    पण पावसाने तामिळनाडूची एवढी दैना केली आहे की द्रमूक सरकारला नवीन योजना जाहीर करून त्याद्वारे अन्न वाटप करण्याची फुरसत देखील झालेली नाही त्यामुळे आधीच तामिळनाडूच्या जयललिता सरकारने आणि नंतरच्या पलानीस्वामी सरकारने सुरु केलेली अम्मा कॅन्टीनची योजना द्रमुक सरकारला बंद करता आलेली नाही. आता तर या अम्मा कॅन्टीन मधूनच तामिळनाडूतल्या पाऊसग्रस्त जनतेला मोफत अन्न वाटप करण्यात येणार आहे. ही घोषणा दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केली आहे.

    Rains trigger “political revolution” in Tamil Nadu; DMK government will get free food from Amma canteen

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!