• Download App
    राहुल गांधींच्या मुंबईतील रॅलीसाठी काँग्रेसची आपल्याच महाविकास आघाडी सरकार विरोधात हायकोर्टात धाव!! |Rahul Gandhi's rally in Mumbai, Congress ran in the High Court against its own Maha Vikas Aghadi government

    राहुल गांधींच्या मुंबईतील रॅलीसाठी काँग्रेसची आपल्याच महाविकास आघाडी सरकार विरोधात हायकोर्टात धाव!!

    वृत्तसंस्था

    मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांची मुंबई प्रदेश काँग्रेसने 28 डिसेंबर रोजी रॅली आयोजित केली आहे. परंतु, पोलिसांनी तिला अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मुंबई प्रदेश काँग्रेस समितीने मुंबई हायकोर्टात धाव घेतली असून उद्या या प्रकरणावर सुनावणी होणे अपेक्षित आहे.Rahul Gandhi’s rally in Mumbai, Congress ran in the High Court against its own Maha Vikas Aghadi government

    या संदर्भातला परवानगी अर्ज आधीच मुंबई पोलिसांकडे पाठविण्यात आला आहे. परंतु ते परवानगी का देत नाहीत हे त्यांनी सांगितलेले नाही, असे मुंबई प्रदेशाध्यक्ष भाई जगताप यांनी पत्रकारांना सांगितले. काँग्रेसने पोलिसांना लेखी स्वरूपात दिले आहे की आम्ही महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या सर्व कोविङ नियमावलीचे पालन करू.



    सर्व नियमावलीला अनुसरूनच ही रॅली आयोजित करण्यात येईल. परंतु तरी देखील पोलिसांनी अद्याप आम्हाला परवानगी का दिली नाही हे समजत नाही, त्यामुळेच मुंबई प्रदेश काँग्रेस समितीने मुंबई हायकोर्टाकडे अर्ज केला आहे, अशी माहिती भाई जगताप यांनी दिली आहे.

    परवाच हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाची मुस्लिम आरक्षण रॅली चांदिवली पार पडली. तिला पोलिसांनी परवानगी नाकारली तरी देखील औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शेकडो गाड्यांसह औरंगाबाद ते मुंबई असा प्रवास केला होता.

    त्या वेळी अनेक ठिकाणी पोलिसांनी अडवून काही गाड्या माघारी पाठवल्या. परंतु, खासदार इम्तियाज जलील हे चांदिवलीला पोहोचले एआयएमआयएम पक्षाने विनापरवाना मुस्लिम आरक्षण घेतली.

    त्यावेळी ओवैसी आणि जलील या दोन्ही खासदारांनी राहुल गांधींच्या रॅलीला परवानगी दिली, मग आम्हाला परवानगी का नाकारता?, असा सवाल केला होता. या रॅलीच्या मुद्द्यावरून खासदार असदुद्दीन ओवैसी आणि जलील यांच्यावर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी अद्याप काँग्रेसच्या 28 डिसेंबरच्या रॅलीला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे काँग्रेसने हायकोर्टात धाव घेतली आहे.

    Rahul Gandhi’s rally in Mumbai, Congress ran in the High Court against its own Maha Vikas Aghadi government

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही