• Download App
    राहुल गांधींची पुन्हा सावरकरांवर टीका; गांधी आणि गोडसे - सावरकरांच्या विचारधारेत भेद |Rahul Gandhi's criticism of Savarkar again; Gandhi and Godse - Differences in Savarkar's ideology

    राहुल गांधींची पुन्हा सावरकरांवर टीका; गांधी आणि गोडसे – सावरकरांच्या विचारधारेत भेद

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टिकास्त्र सोडले आहे. मी अन्य कोणत्याही विचारधारेशी समझोता करू शकतो. परंतु संघ आणि भाजपच्या विचारधारेशी समझोता करू शकत नाही, असे ते म्हणाले. महिला काँग्रेसच्या कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते.Rahul Gandhi’s criticism of Savarkar again; Gandhi and Godse – Differences in Savarkar’s ideology

    राहुल गांधी म्हणाले, की महात्मा गांधी आणि गोडसे – सावरकरांच्या विचारधारेत भेद आहेत. काँग्रेस कार्यकर्ता म्हणून मी अन्य कोणत्याही विचारधारांची समझोता करू शकतो. परंतु गोडसे – सावरकरांच्या आणि संघ भाजपच्या विचारधारेशी कधीही समझोता करू शकत नाही. कारण त्यांची विचारधारा हिंसेला प्रोत्साहन देते आणि महात्मा गांधी यांची विचारधारा अहिंसेची पाठराखण करते असे ते म्हणाले.



     

    राहुल गांधी यांनी महिला काँग्रेसच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सावरकरांवर टीका केल्याने देशाच्या राजकीय वर्तुळात गदारोळ उठला असून सोशल मीडिया राहुल गांधींवर नेटिझन्सनी टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधींची सावरकरांशी बरोबरी होऊ शकत नाही,

    असे अनेक नेटिझन्सनी मत व्यक्त केले आहे. राहुल गांधी अन्य विचारधारांशी म्हणजे इस्लामी दहशतवाद्यांच्या विचारधारांशी सहमत होऊ शकतात का? त्यांच्या हिंसाचाराशी समझोता करू शकतात का?, असा बोचरा सवाल नेटिझन्सनी केला आहे.

    Rahul Gandhi’s criticism of Savarkar again; Gandhi and Godse – Differences in Savarkar’s ideology

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती