• Download App
    आरएसएस मानहानी प्रकरणी राहुल गांधींना मिळणार हजार रुपये|Rahul Gandhi will get Rs 1,000 in RSS defamation case

    आरएसएस मानहानी प्रकरणी राहुल गांधींना मिळणार हजार रुपये

    विशेष प्रतिनिधी

    भिवंडी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१४ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) बदनामी केल्याचा दावा करणारे राजेश कुंटे साक्ष देण्यात विलंब करत असल्याने न्यायालयाने त्यांना हजार रुपयांची दंड ठोठावला आहे. ही रक्कम कॉँग्रेसचे नेते राहूल गांधी यांना मिळणार आहे.Rahul Gandhi will get Rs 1,000 in RSS defamation case

    या खटल्यात साक्ष नोंदविण्यास टाळाटाळ केल्याने कुंटे यांना भिवंडी न्यायालयाने एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची ही रक्कम राहुल गांधी यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.भिवंडी न्यायालयात याप्रकरणी न्यायाधीश जे. व्ही. पालिवाल यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. २१ एप्रिलला भिवंडी न्यायालयात नियमित सुनावणीदरम्यान कुंटे यांनी पुन्हा पुढील तारीख मागितली.



    मात्र, राजकीय व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांच्यासंदर्भात दाखल याचिका नियमित सुनावणी घेऊन लवकरात लवकर निकाली काढाव्यात, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. मात्र, या खटल्यात कुंटे हे विलंब करत असल्याने त्यांना न्यायालयाने एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

    २३ मार्चला याचिकाकर्ते कुंटे यांनी साक्ष न नोंदविता त्यास विलंब केल्याने ५०० रुपये दंड ठोठावला. ही रक्कम राहुल गांधी यांना देण्याचे आदेश दिले. पण, कुंटे यांनी पैसे भरले नसल्याची माहिती राहुल गांधी यांचे वकील अ‍ॅड. नारायण अय्यर यांनी दिली आहे. , या खटल्याची पुढील सुनावणी १० मे रोजी होणार आहे.

    Rahul Gandhi will get Rs 1,000 in RSS defamation case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार