• Download App
    देशातील शेतकऱ्यांवर सरकारचे पद्धतशीरपणे आक्रमण – राहुल गांधी याची टीका|Rahul Gandhi targets Govt. on farmers issue

    देशातील शेतकऱ्यांवर सरकारचे पद्धतशीरपणे आक्रमण – राहुल गांधी याची टीका

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – देशातील शेतकऱ्यांवर सरकारचे पद्धतशीरपणे आक्रमण सुरू आहे. शेतकऱ्यांना जीपखाली चिरडले जात आहे. गृह राज्यमंत्र्यांचे, त्यांच्या मुलाचे नाव समोर येते आहे. या सरकारमध्ये शवविच्छेदनही योग्य प्रकारे होत नसून सरकारविरोधात बोलणाऱ्यांना अटक केली जात आहे अशी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.Rahul Gandhi targets Govt. on farmers issue

    या प्रकरणात सरकार विरोधकांच्या दबावानंतरच कारवाई करेल, असा टोला लगावताना प्रसारमाध्यमे सरकारला प्रश्न विचारण्याचे काम विसरले आहेत, अशा शब्दात माध्यमांनाही लक्ष्य केले.
    राहुल म्हणाले, विरोधी पक्षाचे काम दबाव वाढविण्याचे असते.



    त्यानंतर सरकार कामाला लागते. हत्या करणाऱ्यांचा बचाव व्हावा आणि विरोधकांचा दबाव येऊ नये हीच सरकारची इच्छा असल्याचा आरोप करताना राहुल गांधींनी हाथरस येथील बलात्काराच्या घटनेचे उदाहरण दिले.

    Rahul Gandhi targets Govt. on farmers issue

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi High Court पत्नीला पतीची संपत्ती मानण्याची कल्पना असंवैधानिक; दिल्ली उच्च न्यायालयाने दिला महाभारतातील द्रौपदीचा संदर्भ

    मुर्शिदाबाद मधील दंगल पीडित महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी बंगाल सरकारची, त्यात राजकारण आणि कुचराई नको; NCW अध्यक्षांनी सुनावले!!

    बंगाल आणि बांगलादेश यांच्यातला फरक पुसला; पश्चिम बंगाल राज्य निर्मितीचा हेतूच ममतांनी उद्ध्वस्त केला!!