उर्वरित राजकारणी 2022 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीत व्यग्र असताना काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा परदेश दौऱ्यावर गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी इटलीला गेले असून तेथे ते नवीन वर्ष साजरे करणार आहेत. त्यामुळे त्यांची पंजाबमधील रॅली रद्द करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी राहुल गांधींच्या पुन्हा एकदा परदेशात जाण्याबाबत प्रश्न उपस्थित झाल्यावर पक्षाला स्पष्टीकरण द्यावे लागले. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, राहुल गांधी वैयक्तिक दौऱ्यावर गेले आहेत, त्याबाबत कोणताही अंदाज बांधू नये. Rahul Gandhi leaves for Italy to celebrate New Year before elections, Punjab’s planned meeting canceled
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : उर्वरित राजकारणी 2022 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीत व्यग्र असताना काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा परदेश दौऱ्यावर गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी इटलीला गेले असून तेथे ते नवीन वर्ष साजरे करणार आहेत. त्यामुळे त्यांची पंजाबमधील रॅली रद्द करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी राहुल गांधींच्या पुन्हा एकदा परदेशात जाण्याबाबत प्रश्न उपस्थित झाल्यावर पक्षाला स्पष्टीकरण द्यावे लागले. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, राहुल गांधी वैयक्तिक दौऱ्यावर गेले आहेत, त्याबाबत कोणताही अंदाज बांधू नये.
राहुल गांधींच्या परदेश दौऱ्याची सोशल मीडियावर चर्चा
निवडणुकीपूर्वी राहुल गांधी परदेशात जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. आता नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी ते इटलीला जाणार असल्याची बातमी आली तेव्हा लोकांनी सोशल मीडियावर पुन्हा प्रश्न उपस्थित केले. यूजर्स अनेक प्रकारचे मीम्स देखील तयार करत आहेत. हे प्रकरण ट्रेंड झाल्यावर सुरजेवाला यांना पुढे यावे लागले. ते म्हणाले, राहुल गांधी छोट्या वैयक्तिक दौऱ्यावर आहेत. भाजप आणि त्यांच्या मीडिया मित्रांनी विनाकारण अफवा पसरवू नये. राहुल मायदेशी कधी परतणार हे सुरजेवाला यांनी मात्र सांगितले नाही. ३ जानेवारी रोजी पंजाबमधील मोगा येथे त्यांची रॅली होणार होती, ती रद्द करण्यात आली आहे. या रॅलीतून काँग्रेस आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार होती.
नुकतेच संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीही राहुल गांधी सुमारे महिनाभर परदेशात जाऊन आले होते. अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी राहुल गांधी परतले होते. मोगा रॅली रद्द झाल्यानंतर पंजाबसह अन्य राज्यांतील काँग्रेसचा निवडणूक प्रचार उशिराने सुरू होण्याची भीती आहे. याचा थेट परिणाम व्होट बँकेवर होणार आहे. राहुल यांच्या परदेश दौऱ्याच्या वेळेवरही स्थानिक नेते प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
Rahul Gandhi leaves for Italy to celebrate New Year before elections, Punjab’s planned meeting canceled
महत्त्वाच्या बातम्या
- ५३ जणांच्या धर्मांतरावर ख्रिश्चन संघटनेचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, समाजाच्या भावना दुखावल्याचे सांगत घटनेच्या चौकशीची मागणी
- ‘जवा बघतीस तु माझ्याकडं, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ , भाजपच्या निलंबित आमदाराचा जबरदस्त डान्स ; व्हिडिओ वायरल
- मोदींच्या ऑफरचा पवारांचा दावा : चंद्रकांतदादा म्हणाले, पवारांचा इतिहास तर खरे न बोलण्याचा!!
- उत्तर प्रदेशासह 5 राज्यांत नियोजित वेळेतच निवडणूक; 80 वर्षे वयोगटावरील वृद्ध, कोरोनाबाधित व्यक्तींचे घरातूनच मतदान!!