वृत्तसंस्था
मल्लापुरम : “जखम झाली डोक्याला, मलम लावले पायाला”, अशी वर्तणूक असलेल्या काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी आज केरळ दौऱ्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर पुन्हा एकदा बेछूट टीका केली आहे. पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये उभी फूट पडत आहे. आणि राहुल गांधी त्याच्या विरुद्ध टोकाला केरळमध्ये जाऊन सावरकर – मोदींवर तोफा डागत आहेत.Rahul Gandhi again criticizes Savarkar; Said, “Savarkar thought India was just a piece of land
मल्लापुरममध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना ते म्हणाले, की सावरकरांसारख्या लोकांनी भारताच्या संकल्पनेला सुरुंग लावला. त्यांना भारत म्हणजे एक भूमीचा तुकडा वाटायचा. त्यांनी एक पेन घेतले आणि हिंदू-मुस्लीम अशी भारताची विभागणी करून टाकली. भारताच्या एका बाजूला हिंदू आहेत दुसऱ्या बाजूला मुस्लीम आहेत. जिथे हिंदू आहे तोच भारत आहे, असा प्रचार – प्रसार त्यांनी केल्याचा बेछूट आरोप राहुल गांधी यांनी सावरकरांवर लावला.
पंतप्रधान मोदी यांनी देखील “आयडिया ऑफ इंडिया”वर आघात केला. ते देखील हिंदू-मुसलमान समाजामध्ये फूट पाडण्यावरच विश्वास ठेवतात. त्यांना हिंदू आणि मुसलमान बंधूभावाचे नाते, हिंदी – तमिळ – मल्याळम – मराठी या भाषांचे भगिनी नाते मान्यच नाही आणि म्हणून माझा मोदी आणि सावरकरांच्या विचारसरणीला विरोध आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
पंजाबमध्ये एकीकडे काँग्रेसमध्ये फूट पडत आहे. तिथे पक्षाची वाताहत होत चालली आहे. पंजाबात जाऊन पक्षाची डागडुजी करण्याऐवजी राहुल गांधी केरळला पोचून सावरकर आणि मोदींना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.
Rahul Gandhi again criticizes Savarkar; Said, “Savarkar thought India was just a piece of land