प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीचा राज्यकारभार सोडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाब आणि गोव्यातल्या रस्त्यावर फिरून प्रचार करत आहेत. त्यावर भाजपने दिल्लीतल्या घाण पाण्याचा पुरवठ्यावरून आम आदमी पक्षाच्या सरकारवर वार केले आहेत.Punjab – Kejriwal’s campaign on the streets of Goa; BJP’s attack on “Aap” from dirty water in Delhi
भाजपचे पंजाब प्रभारी आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दिल्लीतल्या घाण पाणीपुरवठा वरून केजरीवाल सरकारला टार्गेट केले आहे. अरविंद केजरीवाल आज गोव्यात आहेत. रस्त्यावरून पायी फिरून घरोघरी जाऊन त्यांनी आम आदमी पक्षाची प्रचार पत्रके वाटली.
मोठ्या जाहीर सभांना बंदी असल्यामुळे चार कार्यकर्त्यांना घेऊन ते गोव्यात घरोघरी जात होते. या आधी पंजाबच्या दौऱ्यात काही ठिकाणी त्यांनी चालत जाऊन आम आदमी पार्टीचा प्रचार केला आहे.याच पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या समस्यांच्या मुद्द्यावरून भाजपने अरविंद केजरीवाल यांचे वाभाडे काढले आहेत.
“घर मे सुखा, दर पर गंदा पानी; “आप”के वादोंकी यही है कहानी!!”, अशा शब्दांमध्ये गजेंद्र सिंह शेखावत यांनी अरविंद केजरीवाल सरकारचे वाभाडे काढले आहेत. आपल्या ट्विटमधून त्यांनी दिल्लीतल्या सर्व प्रकारच्या दुरवस्थेचे फोटो शेअर केले आहेत.
दिल्ली परिसरात तुमसे कुठे घर असेल तर आम आदमी पार्टीच्या सरकारकडून सुविधांची अपेक्षा सोडून द्या, असे खोचक वीट देखील गजेंद्र सिंह शेखावत यांनी केले आहेत. आता आम आदमी पार्टी गजेंद्र सिंग शेखावत यांच्या ट्विटर काय प्रत्युत्तर देते हे पाहणे रंजक ठरणार आहे.
Punjab – Kejriwal’s campaign on the streets of Goa; BJP’s attack on “Aap” from dirty water in Delhi
महत्त्वाच्या बातम्या
- लसीकरणाच्या यशाबद्दल पोस्टल तिकीट प्रसिद्ध
- अमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी घेऊन बसवावा – शिवसेना नेते अरविंद सावंत
- UP Election : आपकडून 150 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ३८ उमेदवार पदव्युत्तर, डॉक्टर, इंजिनिअर्सचाही समावेश
- ठाण्यात जितेंद्र आव्हाडांच्या महाविकास आघाडी प्रस्तावाला शिवसेनेचे महापौर नरेश म्हस्केंकडून सुरुंग!!
- UP Election : योगी आदित्यनाथ यांना विजयी करण्याचे राकेश टिकैत यांचे आवाहन, म्हणाले- माझ्या बोलण्याचा अर्थ शेतकऱ्यांना बरोब्बर समजेल!