• Download App
    लस घोटाळ्याच्या आरोपांनंतर पंजाब सरकारचा यू-टर्न, खासगी रुग्णालयांना लस विक्रीचा आदेश केला रद्द । Punjab govt cancels decision to profit from vaccine selling after Centre’s notice on Vaccine Scam in Punjab

    लस घोटाळ्याच्या आरोपांनंतर पंजाब सरकारचा यू-टर्न, खासगी रुग्णालयांना लस विक्रीचा आदेश केला रद्द

    Vaccine Scam in Punjab : पंजाब सरकारने लसीकरण धोरणात बदल केला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना लस दुप्पट दराने विकण्याच्या प्रकारावर विरोधकांनी केलेल्या आरोपांनंतर पंजाब सरकार बॅकफुटवर आले आहे. कोविड-लसीचे प्रभारी आयएएस विकास गर्ग यांच्या वतीने आदेश देण्यात आले आहेत की, उर्वरित डोस तातडीने खासगी रुग्णालयांनी परत करावेत. लस निधीमध्ये जमा झालेली रक्कम लवकरच सरकारकडून रुग्णालयांना दिली जाईल. Punjab govt cancels decision to profit from vaccine selling after Centre’s notice on Vaccine Scam in Punjab


    विशेष प्रतिनिधी

    चंदिगड : पंजाब सरकारने लसीकरण धोरणात बदल केला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना लस दुप्पट दराने विकण्याच्या प्रकारावर विरोधकांनी केलेल्या आरोपांनंतर पंजाब सरकार बॅकफुटवर आले आहे. कोविड-लसीचे प्रभारी आयएएस विकास गर्ग यांच्या वतीने आदेश देण्यात आले आहेत की, उर्वरित डोस तातडीने खासगी रुग्णालयांनी परत करावेत. लस निधीमध्ये जमा झालेली रक्कम लवकरच सरकारकडून रुग्णालयांना दिली जाईल.

    कोव्हॅक्सिनच्या 1 लाख कुप्यांपैकी पंजाब सरकारने राज्यातील खासगी रुग्णालयांना एक डोस 1,060 रुपये दराने विकल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. या कोरोना लस सरकारने 400 रुपयांमध्ये विकत घेतल्या होत्या. राज्यातील खासगी रुग्णालये सरकारकडून खरेदी केलेल्या लसीसाठी सर्वसामान्यांना 1560 रुपये आकारून मोठा नफा कमावत होती.

    हा प्रकार उजेडात आल्यानंतर विरोधी पक्षाने सरकारवर हल्ला चढवला. तीव्र विरोध होत असल्याचे पाहून शुक्रवारी सरकारने हा निर्णय मागे घेण्याचे आदेश जारी केले. कोविड लस लसीकरणाच्या मोहिमेचे प्रभारी आयएएस विकास गर्ग यांनी एक आदेश जारी केला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, लसीकरणाबाबत खासगी रुग्णालयांमध्ये गंभीर दुर्लक्ष झाले आहे. यामुळे सरकार यापुढे ही लस खासगी रुग्णालयांना विकणार नाही. सरकारने जारी केलेल्या आदेशात उर्वरित लसही मागे घेण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. सरकारही रुग्णालयांचा व्हॅक्सिन फंडमध्ये जमा पैसा लवकरच रिलीज करणार आहे.

    गुरुवारी शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल यांनी पंजाब सरकारवर लस खासगी रुग्णालयांना विकल्याचा आरोप केला. हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत सुखबीर यांनी हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली होती. आरोग्यमंत्री बलबीरसिंग सिद्धू हे पंजाबमधील लोकांच्या जिवाशी खेळण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी शिरोमणी अकाली दलाच्या प्रमुखांनी केली होती.

    Punjab govt cancels decision to profit from vaccine selling after Centre’s notice on Vaccine Scam in Punjab

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले