• Download App
    स्वातंत्र्यानंतर अनेक स्वातंत्र्ययोध्यांचे योगदान पुसून टाकण्याचा प्रयत्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॉँग्रेसवर हल्लाबोल|Prime Minister Narendra Modi's attack on the Congress, an attempt to erase the contribution of many freedom fighters after independence

    स्वातंत्र्यानंतर अनेक स्वातंत्र्ययोध्यांचे योगदान पुसून टाकण्याचा प्रयत्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॉँग्रेसवर हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: स्वातंत्र्यानंतर अनेक स्वातंत्र्ययोद्ध्यांचे योगदान पुसून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. या चुका आता आम्ही सुधारत आहोत, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला आहे.नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त इंडिया गेट येथे होलोग्राम पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते झाले. होलोग्राम पुतळ्याची उंची २८ फूट आणि रुंदी ६ फूट आहे.Prime Minister Narendra Modi’s attack on the Congress, an attempt to erase the contribution of many freedom fighters after independence

    ९० टक्के पारदर्शी होलोग्राफिक स्क्रीन अशा पद्धतीने उभारली गेली आहे, की ही स्क्रीन कुणाला दिसणार नाही.यावेळी बोलताना मोदी म्हणाले, स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षापर्यंत म्हणजे २०४७पर्यंत नव्या भारताचे स्वप्न साकार करण्यामध्ये जगातील कुठलीही शक्ती आड येऊ शकत नाही. नेताजींनी आम्ही हे करू शकतो आणि करणार अशी प्रेरणा दिली. तरुणांनी त्यांच्याकडून शिकावे.



    दुदैर्वाने, स्वातंत्र्यानंतर देशाच्या संस्कृतीबरोबरच अनेक स्वातंत्र्ययोद्ध्यांचे योगदान पुसून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात लक्षावधी नागरिकांचे योगदान होते; पण इतिहासाला मर्यादित ठेवण्याचे प्रयत्न झाले. स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांनी ही चूक आपण सुधारत आहोत.

    मोदी म्हणाले, भारताच्या भूमीवर पहिले स्वतंत्र सरकार नेताजींनी स्थापन केले. त्यांचा भव्य पुतळा इंडिया गेट येथे डिजिटल स्वरूपात उभारला जात आहे. या होलोग्राम पुतळ्याचे रूपांतर लवकरच भव्य ग्रॅनाइटच्या पुतळ्यामध्ये होईल. तरुणांना तो प्रेरणा देत राहील.ज्या नेताजींनी आपल्याला स्वतंत्र आणि सार्वभौम भारताचा विश्वास दिला, ज्यांनी मोठ्या अभिमानाने, आत्मविश्वासाने आणि धैयार्ने इंग्रजांसमोर सांगितले की मी स्वातंत्र्याची भीक मागणार नाही, मी ते मिळवीन. हा पुतळा स्वातंत्र्याच्या महान नायकाला कृतज्ञ राष्ट्राकडून श्रद्धांजली आहे. नेताजी सुभाष यांचा हा पुतळा आपल्या लोकशाही संस्थांना, आपल्या पिढ्यांना राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देईल.

    गेल्या वर्षी देशाने नेताजींची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्यास सुरुवात केली. आज सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कारही या निमित्ताने प्रदान करण्यात आला आहे. नेताजींच्या जीवनातून प्रेरणा घेऊन हे पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली. आम्ही सुधारणांवर भर दिला आहे तसेच मदत, बचाव आणि पुनर्वसन यावर भर दिला आहे.

    आम्ही देशभरात एनडीआरएफचे बळकटीकरण, आधुनिकीकरण, विस्तार केले. तंत्रज्ञानापासून नियोजन आणि व्यवस्थापनापर्यंत सर्वोत्कृष्ट पद्धतींचा अवलंब करण्यात आला. याआधी प्रत्येक चक्रीवादळात शेकडो लोकांचा मृत्यू होत असे, मात्र गेल्या काही काळात आलेल्या चक्रीवादळात असे घडले नाही. प्रत्येक आव्हानाला देशाने नव्या ताकदीने उत्तर दिले. या आपत्तींमध्ये आम्ही शक्य तितके जीव वाचवू शकलो, असे पंतप्रधानांनी सांगितले.

    मोदी म्हणाले, गेल्या वर्षी याच दिवशी मला नेताजींच्या कोलकाता येथील वडिलोपार्जित निवासस्थानी जाण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. ज्या गाडीतून ते कोलकाता सोडून निघाले ती गाडी, ती खोली, ज्या खोलीत तो अभ्यास करत असे, त्यांच्या घराच्या पायऱ्या, त्या घराच्या भिंती, त्यांचं दर्शन हा सगळा अनुभव शब्दांपलीकडचा आहे.

    आझाद हिंद सरकारला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा २१ आॅक्टोबर २०१८ चा दिवसही मी विसरू शकत नाही. लाल किल्ल्यावर आयोजित एका विशेष समारंभात मी आझाद हिंद फौजेची टोपी परिधान करून तिरंगा फडकवला होता. तो क्षण अद्भुत, अविस्मरणीय आहे. नेताजी सुभाष यांनी काही करण्याचा निश्चय केला तर कोणतीही शक्ती त्यांना रोखू शकत नव्हती. नेताजी सुभाष यांच्या कॅन डू, विल डू ही प्रेरणा घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे.

    Prime Minister Narendra Modi’s attack on the Congress, an attempt to erase the contribution of many freedom fighters after independence

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी