विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जगभरातील अनेक नेत्यांना मागे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक स्तरावरील सर्वेक्षणामध्ये सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. अमेरिकेतील ग्लोबल लीडर अप्रूव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने हे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात पंतप्रधान मोदी यांना सर्वाधिक मते मिळाली आहे. 13 ते 19 जानेवारी दरम्यान या सर्वेक्षणासाठी माहिती गोळा करण्यात आली आहे. Prime Minister Narendra Modi is at the top, trailing 13 heads of state in the world !!
पंतप्रधान मोदींच्या खालोखाल मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी दुसरे तर इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रॅगी यांनी तिसरे स्थान पटकाविले आहे. पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर स्पर्धेत अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनी या देशाचे नेतेही सहभागी होते. मात्र अखेरीस ७१ % मिळवत पंतप्रधान मोदी यांनी पहिले स्थान पटकाविले आहे.
अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म ‘द मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता रेटिंगमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासह जगातील १३ राष्ट्रप्रमुखांना मागे टाकले आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी – ७१ %
- मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर – ६६ %
- इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रॅगी -६० %
- जपानचे पंतप्रधान फुमिओ किशीदा -४८ %
- जर्मनीचे ओलाफ शुल्त्स – ४४ %
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन – ४३ %
- कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदो – ४३ %
- ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन -४१ %
- ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो – ३७ %
- फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन – ३४ %
- ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन – २६ %
Prime Minister Narendra Modi is at the top, trailing 13 heads of state in the world !!
महत्त्वाच्या बातम्या
- घर मालकांना दिलासा, पोलीस ठाण्यात भाडेकरूंची माहिती देण्याची गरज नसल्याचे पोलीस महासंचालक कार्यालयाने केले स्पष्ट
- पीएम मोदींच्या हस्ते सोमनाथच्या नवीन सर्किट हाऊसचे उद्घाटन, वाचा पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- मोठी बातमी : सर्व मंत्रालयांच्या महत्त्वाच्या बैठकीत स्मार्टवॉच आणि स्मार्टफोनवर बंदी, व्हॉट्सअॅप-टेलिग्रामसह अलेक्सा-सिरीही बॅन