PM Modi Meeting With 11 BJP National secretary : काल भाजपच्या 11 राष्ट्रीय सचिवांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी बैठक झाली. यानंतर सर्व राष्ट्रीय सचिव पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठकीसाठी गेले. ही बैठक तब्बल सहा तास चालली. यामध्ये महाराष्ट्रातून विजया रहाटकर, पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर यांचा समावेश होता. बैठकीत पंतप्रधानांनी स्वत: प्रत्येक सचिवाशी वैयक्तिक संवाद साधत मार्गदर्शन केले. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर पंतप्रधानांची ही पहिलीच भेट असल्याने या बैठकीची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. PM Modi Meeting With 11 BJP National secretary in New Delhi, Read Detailed Story
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काल भाजपच्या 11 राष्ट्रीय सचिवांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी बैठक झाली. यानंतर सर्व राष्ट्रीय सचिव पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठकीसाठी गेले. ही बैठक तब्बल सहा तास चालली. यामध्ये महाराष्ट्रातून विजया रहाटकर, पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर यांचा समावेश होता. बैठकीत पंतप्रधानांनी स्वत: प्रत्येक सचिवाशी वैयक्तिक संवाद साधत मार्गदर्शन केले. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर पंतप्रधानांची ही पहिलीच भेट असल्याने या बैठकीची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे.
का आयोजित करण्यात आली होती बैठक?
राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यानंतर पंतप्रधान मोदी या नव्या पदाधिकाऱ्यांना आतापर्यंत भेटले नव्हते, यामुळे ही संवाद बैठक यापूर्वीच नियोजित करण्यात आलेली होती. जूनच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधानांनी राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष यांना भेटले होते, आणि काल ते राष्ट्रीय सचिवांना भेटले.
या बैठकीत काय झालं?
पंतप्रधानांनी सगळी संघटनात्मक समीक्षा केली. पक्षाचे कार्यक्रम उदा. आणीबाणीविरोधी दिन, श्यामाप्रसाद मुखर्जी दिन, लसीकरणाचे उपक्रम, कोरोना योद्ध्यांचा सत्कार व इतर अनेक जे पक्षाचे उपक्रम आहेत, त्यांचा आढावा घेतला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व राष्ट्रीय सचिवांचा लेखाजोखा तयार करण्यात आला होता. प्रत्येक राष्ट्रीय सचिवाचे 25 पॅरामीटर्सच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले. प्रत्येक राष्ट्रीय सचिवाला पंतप्रधानांनी वैयक्तिक बोलून संवाद साधला आणि मार्गदर्शन केले. सायंकाळी पाच वाजेपासून सुरू झालेली ही बैठक रात्री 11 वाजेपर्यंत सुरू होती. पंतप्रधान स्वत: 6 तास या बैठकीत होते. राष्ट्रीय सचिवांना ते कुठे कमी पडत आहेत, मग सोशल मीडियावरचे अस्तित्व असेल किंवा तळागाळातील काम असेल अशा सर्व बाबींवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी स्वत: पक्षातील नेत्यांना एवढा वेळ देऊन मार्गदर्शन करणे, हे पक्ष संघटनेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे.
‘११ राष्ट्रीय सचिवांपैकी पंकजा मुंडे एक…’
दरम्यान, महाराष्ट्रातील बहुतांश माध्यमांनी पंकजा मुंडे या नाराज असल्याने नड्डा व मोदींना भेटायला दिल्लीला गेल्याचे वृत्त दिले आहे. परंतु यात काहीही तथ्य नाही. राष्ट्रीय सचिवांची बैठक महिनाभर आधीपासूनच नियोजित होती. या बैठकीत पक्षबांधणीच्या दृष्टीने सल्ला, मार्गदर्शन व दस्तुरखुद्द पंतप्रधानांचा संवाद असेच याचे स्वरूप होते. याशिवाय पंकजा मुंडे यांनी स्वत:ही नाराजीचे यापूर्वी वृत्त फेटाळलेले आहे.
5 राज्यांत निवडणुका, 33 ठिकाणी पोटनिवडणुका
आगामी काळात पाच राज्यांत निवडणुका होऊ घातल्या आहेत, याशिवाय 33 जागांवर पोटनिवडणुकाही आहेत. यादृष्टीनेही संघटनात्मक रणनीतीवर त्यावर खल झाला. देशातील सर्वोच्च नेत्याने पक्ष पदाधिकाऱ्यांना तब्बल सहा वेळ देणे, ही निश्चितच मोठी बाब आहे. पक्ष संघटनेतील कामावर पंतप्रधान मोदींचेही बारीक लक्ष असल्याचेच यावरून दिसून येते.
PM Modi Meeting With 11 BJP National secretary in New Delhi, Read Detailed Story
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रीय स्वंयसेवक संघ दक्ष; कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी स्वयंसेवकांना देशव्यापी प्रशिक्षण
- आमीर खानसारखेच लोक लोकसंख्या वाढविण्यास कारणीभूत, भाजपा खासदार सुधीर गुप्ता यांचा आरोप
- कोरोना महामारीमुळे भीषण परिस्थिती असूनही देशातील थेट करवसुलीचे प्रमाण ९१ टक्यांनी वाढले
- लडाखमधील शंभर टक्के जनतेल मिळाला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस
- किटेक्स ग्रुप केरळ सोडून गेल्याने शशी थरुर यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल, गुंतवणूक राज्यातून परत जाण्यासाठी कम्युनिस्ट सरकारचे सर्व प्रयत्न