विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – मानवतेच्या दृष्टिकोनातून भारताचा गहू पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानला पाठवण्यास पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तयारी दर्शविली आहे. यानुसार भारताचा ५० हजार मेट्रिक टन गहू पाकिस्तानच्या हद्दीतून अफगाणिस्तानला रवाना केला जाणार आहे.Pakistan gave permission to India for sending Wheat
इम्रान खान यांनी गहू पाठविण्याबाबतच्या मार्गाचा आढावा घेतल्यानंतर परवानगी देण्याचा निर्णय घेतला. इस्लामाबाद येथे इम्रान खान यांनी स्थापन केलेल्या अफगाणिस्तान अंतर्गत मंत्रालय समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीला पंतप्रधान इम्रान खान उपस्थित होते. अफगाणिस्तानला मदत करण्यासाठी जगाने पुढे यावे, असे आवाहन इम्रान खान यांनी केले.
सरकारी रेडिओ पाकिस्तानच्या वृत्तानुसार, या बैठकीत इम्रान खान यांनी ५० हजार मेट्रिक टन गहू पाठविण्याबाबत मंजुरी दिली. भारताने मानवतेच्या दृष्टिकोनातून अफगाणिस्तानला गहू पाठविण्याबाबतचा प्रस्ताव मांडला होता.सध्या पाकिस्तान केवळ अफगाणिस्तानला भारताला माल निर्यात करण्याची परवानगी देत आहे.
परंतु सीमेपलिकडे दोन्ही बाजूंनी व्यापार करण्यास परवानगी नाही. गेल्या महिन्यांत भारताने गहू देण्याची घोषणा केली आणि पाकिस्तानच्या वाघा सीमेवरून खाद्यान्न पाठवण्याची मागणी केली होती. अफगाणिस्तानचे कार्यकारी परराष्ट्र मंत्री आमीर मुत्ताकी यांनी इम्रान खान यांना भारतीय गव्हाबाबत विनंती केली होती. तालिबानचे सरकार भारताकडून मदत स्वीकारण्यास तयार असल्याचेही त्यांनी इम्रान खान यांना सांगितले होते.
गेल्यावर्षी देखील अफगाणिस्तानला मदत
भारताने अफगाणिस्तानला नेहमीच मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत केली आहे. गेल्या दहा वर्षात भारताने अफगाणिस्तानला दहा लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक गहू निर्यात केला आहे. गेल्यावर्षी देखील ७५ हजार मेट्रिक टन गहू दिला होता.
Pakistan gave permission to India for sending Wheat
महत्त्वाच्या बातम्या
- अॅमेझॉनच्या भारतातील प्रमुखांना ईडीचे समन्स, फ्युचर ग्रुपच्या प्रवर्तकांचीही घेणार झाडाझडती
- अमृता फडणवीस यांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर पुन्हा निशाणा
- गुरूनानक जयंतीनिमित्त पाकिस्तानला गेली आणि मुस्लिम धर्म स्वीकारून पाकिस्तान्याशी लग्न करून आली
- त्रिपुरातील “सोंदेश” लागला ममतांना कडू, भाजपला गोड!! पण तो मधूर कुणाला लागलाय?