• Download App
    पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा साखरपुडा ; आपल्या बहिणीशीच करणार लग्न ; बाबरवर यापूर्वी लैंगिक शोषणाचे आरोप।Pakistan captain Babar Azam engagement

    पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा साखरपुडा ; आपल्या बहिणीशीच करणार लग्न ; बाबरवर यापूर्वी लैंगिक शोषणाचे आरोप

    पाकिस्तानी क्रिकेट संघातून एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे ,पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम आपल्याच बहिणीशी लग्न करणार आहे . Pakistan captain Babar Azam engagement


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने साखरपुडा केला आहे. बाबरने आपल्या चुलत बहिणीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षी या दोघांचे लग्न होणार आहे. २६ वर्षीय बाबर तीनही स्वरूपात संघाचे कर्णधारपद सांभाळतो.पाकिस्तानी वाहिनी जिओ न्यूजने ही माहिती दिली आहे.



    बाबरवर लैंगिक शोषणाचा आरोप

    काही महिन्यांपूर्वी बाबर आझमवर एका महिलेने लैंगिक अत्याचार आणि धमकावल्याचा आरोप केला होता. बाबरने लग्नाची आश्वासने दिली असल्याचे या महिलेने सांगितले होते. लाहोरमधील कोर्टाने पाकिस्तानच्या केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला एफआयआर नोंदविण्याचे आदेशही दिले होते.

    लग्नाच्या बहाण्याने बाबर आझमने 10 वर्ष लैंगिक अत्याचार केल्याचे या महिलेने म्हटले होते. मी गरोदर राहिल्यावर बाबरने मला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेच्यानुसार बाबर आणि ती एकाच शाळेत शिकले होते. दोघेही एकाच मोहल्यात राहत होते.

    Pakistan captain Babar Azam engagement

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    IPL 2025 : आयपीएल २०२५चे नवीन वेळापत्रक जाहीर, १७ मे पासून सामना सुरू होणार

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानात पुन्हा ड्रोन दिसले; होशियारपूरमध्ये 5-7 स्फोट, ब्लॅकआऊट

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!