कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांकडून आरोपांची कोल्हेकुई सुरू आहे. मात्र, केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर देशातील तब्बल ७४ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले आहे.opposition’s allegations, 74 per cent people are satisfied with Prime Minister Narendra Modi
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांकडून आरोपांची कोल्हेकुई सुरू आहे. मात्र, केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर देशातील तब्बल ७४ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सी व्होटर या संस्थेने केलेल्या सर्व्हेत कोरोना काळात सरकारने केलेल्या कामावर समाधानी आहात? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर 74 टक्के लोकांनी, हो असे उत्तर दिले, म्हणजेच ते समाधानी आहेत. 21 टक्के लोक असमाधानी होते. या सर्व्हेत सी-व्होटरने देशातील 40 हजार लोकांची मते जाणून घेतली.
गेल्या तीन महिन्यात, कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू झाली होती आणि सरकारने काम करायला सुरुवात होताच, नाराजी कमी झाली. 15 एप्रिलच्या जवळपास सरकारवर समाधारी असलेल्या लोकांची संख्या 57.7 टक्के होती.
यावेळी, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवातच होती. लोकांना कोरोना काळात गरज असताना बेड, ऑक्सिजन मिळाले? असा प्रश्न सी-व्होटरने विचारला असता, 32 टक्के लोकांनी सहजपणे मिळाले, असे उत्तर दिले. तर 14 टक्के लोकांनी थोडा त्रास झाला असे उत्तर दिले.
याच बरोबर 6 टक्के लोकांनी प्रचंड त्रास झाला, तर 9 टक्के लोकांनी म्हटले आहे, की हे मिळाले नाही. आवश्यकताच भासली नाही, असे 39 टक्के लोकांचे म्हणणे आहे.कोरोनाची दुसरी लाट 7 मे रोजी पीकवर होती. तेव्हा केवळ 34.6 टक्के लोक केंद्र सरकारच्या कामावर समाधानी होते. 16 मेपर्यंत असमाधानी लोकांची संख्या अधिक झाली. या काळात केवळ 32.9 टक्के लोकच संतुष्ट होते.
opposition’s allegations, 74 per cent people are satisfied with Prime Minister Narendra Modi
महत्त्वाच्या बातम्या
- अनोखी प्रेमकहानी, मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांच्या लग्नासाठी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती मध्यस्ती
- विजय मल्याचे शेअर्स विकून होणार ६,२०० कोटी रुपयांची वसुली
- देशाचे कायदे सर्वोच्च, तुमची धोरणे नाही, संसदीय समितीने ट्विटरला फटकारले
- ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग यांचे कॉरोनामुळे निधन
- ‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांचं निधन ; पत्नी पाठोपाठ घेतला जगाचा निरोप!