प्रतिनिधी
कोल्हापूर : लोकसभा निवडणुका 2 वर्षांवर येऊन ठेपल्या असताना असताना सर्व विरोधकांच्या केवळ एकत्र येण्याच्या गप्पा सुरू आहेत. पण प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यायी चेहरा देण्यात विरोधकांना यश आलेले आहे. मोदींना पर्यायी चेहरा देण्यात विरोधकांमध्ये मतभेद आहेत, अशी कबुली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरातल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
Opposition to give Modi a choice pawar said
सर्व विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी बैठका होतात सर्व पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करतात. परंतु, भाजपमध्ये जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्कम नेतृत्व आहे. 2024 मध्ये देखील मोदींचा चेहरा पंतप्रधानपदासाठी जनतेसमोर आहे, अशा स्थितीत विरोधकांना पर्याय देण्यास वेळ का लागतो आहे?, असा प्रश्न पवारांना पत्रकार परिषदेत विचारला त्यावर पवारांनी विरोधकांमध्ये मतभेद असल्याची कबुली दिली.
वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये विरोधक भाजपशी लढण्याऐवजी एकमेकांशीच लढताना दिसतात. असे त्यांनी पश्चिम बंगाल आणि केरळ चे उदाहरण देऊन सांगितले. बंगालमध्ये ममता बॅनर्जीं बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस होती. परंतु, काँग्रेस आणि डावे पक्ष वेगळे झाले. केरळमध्ये देखील डावे पक्ष आणि काँग्रेस यांच्यात मतभेद आहेत. जोपर्यंत हे मतभेद सोडवले जात नाहीत तोपर्यंत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला पर्यायी नेतृत्व देणे शक्य होत नाही, अशी कबुली शरद पवारांनी दिली आहे.
राजस्थानची राजधानी जयपूर मध्ये काँग्रेसचे चिंतन शिबिर होत आहे. या चिंतन शिबिरात 400 हून अधिक नेते आणि कार्यकर्ते सहभागी होत आहेत. तेथे नरेंद्र मोदींच्या पर्यायी नेतृत्व संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर पवार यांनी आपल्या विरोधी गोटात मतभेद असल्याचे भाष्य करून एक प्रकारे काँग्रेसच्या चिंतन शिबिराला पंक्चर करण्याचा प्रयत्न केल्याचे मानण्यात येत आहे.
Opposition to give Modi a choice pawar said
महत्वाच्या बातम्या
- OBC Reservation : ठाकरे – पवार सरकारला “फटका”; पण ओबीसी आरक्षण हिरावून घेण्यात पवार “यशस्वी”!!
- ओबीसी आरक्षणातील दिरंगाई : मध्य प्रदेशालाही सुप्रीम कोर्टाचा झटका; 2 आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे आदेश!!
- काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी म्हणात, पक्षाचे ऋण फेडण्याची आता वेळ आली आहे
- १० मे आणि १८५७ चं स्वातंत्र्य समर!