Olympic medalist Sushil Kumar : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पाच मे रोजी छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीपटूंच्या दोन गटांमध्ये मोठा वाद झाला होता. छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीपटूंच्या दोन गटांत झालेल्या हाणामारीत पाच जण जखमी झाले होते. पाच पहिलवानांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी एफआयआरमध्ये ऑलिम्पिक पदकविजेते कुस्तीपटू सुशील कुमार यांचेदेखील नाव आले आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारविरोधात लूक आऊट नोटीसही जारी केली आहे. Olympic medalist Sushil Kumar absconding in murder case, look out notice issued By Delhi Police
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पाच मे रोजी छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीपटूंच्या दोन गटांमध्ये मोठा वाद झाला होता. छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीपटूंच्या दोन गटांत झालेल्या हाणामारीत पाच जण जखमी झाले होते. पाच पहिलवानांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी एफआयआरमध्ये ऑलिम्पिक पदकविजेते कुस्तीपटू सुशील कुमार यांचेदेखील नाव आले आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारविरोधात लूक आऊट नोटीसही जारी केली आहे.
दिल्लीच्या मॉडेल टाऊन ठाण्याच्या पोलिसांनी सुशील कुमार यांच्या शोधात अनेक ठिकाणी छापे टाकले, पण त्यांना ते सापडले नाहीत. हत्या प्रकरणातील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुशील कुमार यांना पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी दिल्ली एनसीआर तसेच इतर राज्यांमध्ये छापे टाकले आहेत.
दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले, या हत्येत ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारचा हात असल्याचा पुरावा आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात पोलिसांनी सुशील कुमारचे सासरे सतपाल सिंह यांच्यासह डझनभर लोकांची चौकशी केली आहे. या प्रकरणात नाव आल्यापासून सुशील कुमार फरार आहे.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रसाल स्टेडियमवरील भांडणाचे कारण मालमत्तेचा वाद होता. संपत्तीच्या वादातच हिंसा आणि खून झाला. ही घटना 5 मे रोजी घडली. आता दिल्ली पोलीस सुशील कुमारचा कसून शोध घेत आहेत.
Olympic medalist Sushil Kumar absconding in murder case, look out notice issued By Delhi Police
महत्त्वाच्या बातम्या
- हरियाणा सरकारचा मोठा निर्णय, होम आयसोलेट गरीब कोरोना रुग्णांना 5000 रुपयांची मदत, थेट खात्यात टाकणार पैसे
- CoWin Portal वर नवे बदल, लस निवडीची सर्वसामान्यांना मुभा, लसीकरणावेळी दाखवावा लागणार OTP, वाचा.. कशी कराल नोंदणी!
- कोरोना हे जैविक शस्त्र, चिनी शास्त्रज्ञांकडून 2015 पासून संशोधन, ऑस्ट्रेलियन माध्यमांच्या दाव्याने जगभरात खळबळ
- गोव्यात चित्रपट, मालिकांच्या शूटिंगवर बंदी; हिंदी, मराठी मालिका सापडल्या संकटात
- कोरोना लसीवरील बौद्धीक संपदा हक्क रद्द करण्याच्या निर्णयाकडे लागले साऱ्या जगाचे लक्ष