पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीव वाचवण्यासाठी लपून छपून नेपाळमध्ये भेटत होते. पाकिस्तानी सैन्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी नवाज शरीफ यांचा हा प्रयत्न सुरू होता, असा आरोप इम्रान खान यांनी केला आहे.Nawaz Sharif secretly meetsNarendra Modi in Nepal to save lives, accuses Pakistan PM Imran Khan
विशेष प्रतिनिधी
पाकिस्तान : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीव वाचवण्यासाठी लपून छपून नेपाळमध्ये भेटत होते. पाकिस्तानी सैन्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी नवाज शरीफ यांचा हा प्रयत्न सुरू होता, असा आरोप इम्रान खान यांनी केला आहे.
जनरल शरीफला नरेंद्र मोदी दहशतवादी म्हणत होते. नवाज शरीफ मोदींचे कौतुक करत होते, अशा वेळी मी तर शांत बसलो नसतो. मात्र नवाज शरीफ दोस्ती करत होते. मोदीही शरीफ यांच्या घरच्या लग्नसोहळ्यात हजरे लावत होते. एकीकडे ड्रोन हल्ल्यात सर्वसामान्य लोक मारले जात होते आणि नवाज शरीफ म्हणत होते, मला नाही फरक पडत त्यांच्या मरण्याने, ही कोणती पद्धत आहे? असा सवालही इम्रान खान यांनी केला आहे.
दरम्यान, सरकार पाडण्यामध्ये परदेशी शक्तींचा हात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. इमरान खान यांच्या पंतप्रधान पदाचा कार्यकाळ 3 वर्ष 10 महिने पूर्ण झाला आहे. अजून त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यासाठी कालावधी शिल्लक असतानाच त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला गेला आहे. मात्र, पाकिस्तानात आतापर्यंत एकही पंतप्रधान त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु शकलेला नाही.
इम्रान खान यांच्या सरकारचा फैसला पुन्हा अविश्वास ठरावावर मतदान घेऊन केला जााणार आहे. पाकिस्तानी लष्करानं गेल्या काही दिवसांपासून सत्तासंघर्षात कोणतीही भूमिका घेतलेली नाही, असं शाहबाज शरिफ यांनी म्हटलं आहे. शाहबाज शरीफ हे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे भाऊ आहेत. त्यांना पीएम प्रोटोकॉल देण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचं बोललं जातंय. त्यामुळे सध्या जगाचे लक्ष पाकिस्तानकडे लागले आहे.
Nawaz Sharif secretly meetsNarendra Modi in Nepal to save lives, accuses Pakistan PM Imran Khan
महत्त्वाच्या बातम्या
- महत्त्वाची बातमी : घटस्फोटित पतीला शिक्षक पत्नीने दरमहा द्यावी पोटगी, औरंगाबाद उच्च न्यायालयाचा आदेश
- पुण्यात पुन्हा हेल्मेट सक्ती ! जिल्हाधिकारी यांचे आदेश; शासकीय कर्मचारी, शाळा, महाविद्यालयात हेल्मेट पुन्हा बंधनकारक
- शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शाळा मानक प्राधिकरण स्थापन
- 12 तासांच्या चौकशीनंतर नागपूरातील वादग्रस्त वकील सतीश उके यांना ईडीकडून अटक!!; ट्रान्झिट बेलवर नेणार मुंबईला!!