विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंजाबचे माजी मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांची अखेर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी तत्काळ प्रभावाने पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. काँग्रेसकडून अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. आता सिद्धू हे सुनील जाखड यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.Navjyot Singh Sidhu appointed state president of Punjab Congress despite Amarinder Singh’s opposition
सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार काँग्रेसने पंजाब काँग्रेस समितीवर चार कार्यकारी अध्यक्ष देखील नेमले आहेत. यामध्ये संगतसिंग गिलजियां, सुखविंदरसिंग डैनी, पवन गोयल आणि कुलजीतसिंग नागरा यांचा समावेश आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून काढण्यात आलेल्या पत्रकावर काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांची स्वाक्षरी आहे.
आतापर्यंत प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणाºया सुनील जाखड यांच्या योगदानाची पक्ष प्रशंसा करतो आहे, असेही पत्रकात म्हटले आहे. कुलजीतसिंग नागरा यांना सिक्कीम, नागालँण्ड आणि त्रिपुराच्या एआयसीसीच्या अध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त देखील करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर राज्यात मोठी संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सुरू होती. शुक्रवारीच सिद्धू यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या वेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पंजाबचे प्रभारी हरीश रावत उपस्थित होते.
पंजाबमधील वादाबाबत सर्व आमदार आणि मंत्र्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी हायकमांडने तीन सदस्याचं पॅनल तयार केलं होतं. काँग्रेस नेते हरिश रावत यांच्या नेतृत्वात हे पॅनल तयार करण्यात आले होते. त्यात मल्लिकार्जुन खरगे आणि जेपी अग्रवाल यांचा समावेश आहे. हे पॅनल एकाएका आमदार आणि मंत्र्याशी चर्चा करून त्यांचं म्हणणं ऐकणार आहेत. त्यानंतर हा अहवाल हायकमांडला देण्यात येणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
पंजाबमध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकीची मोचेर्बांधणी होत असताना, काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पंजाब काँग्रेस दोन गटात विभागली आहे. एक गट नवज्योत सिद्धू यांचा तर दुसरा मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा आहे.
अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी होत आहे. त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक आमदारांनी आवाज उठवला आहे. हे प्रकरण इतकं वाढलं आहे की, काँग्रेसच्या केंद्रीय समितीला हस्तक्षेप करावा लागला.
मात्र, कॅ. अमरिंदरसिंग यांनी मात्र सिध्दू यांना विरोध केला आहे. त्यामुळे या निर्णयानंतर तरी पंजाब काँग्रेसमधील कॅप्टन अमरिंदर सिंह आणि नवज्योतसिंह सिद्धू यांच्यातील अंतर्गत संघर्ष थांबतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Navjyot Singh Sidhu appointed state president of Punjab Congress despite Amarinder Singh’s opposition
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेस आमदाराच्या मुलावर बलात्काराचा आरोप, माहिती देणाऱ्यास एमपी पोलिसांकडून 5000 रुपयांचे बक्षीस जाहीर
- ओवैसींचा पक्ष AIMIM चे अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक, हॅकरने लावला एलन मस्कचा फोटो !
- यूपीमध्ये ब्राह्मण संमेलने भरवून मायावतींचे सत्ता काबीज करण्याचे स्वप्न, 2007ची पुनरावृत्ती होईल?
- अधीर रंजन बनणार लोकसभेचे विरोधी पक्षनेते, वाचा सविस्तर… संसदेत आता काँग्रेसने कुणाला कोणती जबाबदारी दिली!