विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्याकडे केवळ पंतप्रधान म्हणून नव्हे तर समाजसुधारक म्हणूनही पाहण्याची गरज आहे. गेली आठ वर्षे भारताच्या राजकारणात अतिशय महत्त्वाची आणि दिशा ठरवणारी वर्षे आहेत. पंतप्रधान मोदी यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यापासून प्रेरणा घेऊन सातत्याने असा योजना राबविल्या आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केले आहे.Narendra Modi needs to be seen as a social reformer, not only as a Prime Minister
पात्रा म्हणाले, मोदी हेही महात्मा फुलेंप्रमाणे अविरत काम करतात. मागील 8 वर्षे हिंदुस्तानच्या राजकारणातील अतिशय महत्वपूर्ण व दिशानिर्धारण करणारी वर्षे ठरली आहेत. पंतप्रधान मोदी यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यापासून प्रेरणा घेऊन सातत्याने असा योजना राबविल्या आहेत.
ज्याद्वारे महिलांचे सशक्तीकरण होऊ शकेल व मागासवर्गीय लोक पुढे जावेत. महात्मा ज्योतिबा फुले जसे समाज सुधारक आहेत तसेच मोदीही समाज सुधारकांप्रमाणे दिवसभर परिश्रम करतात. मोदींना समाज सुधारक या रूपात पाहण्याचीही आवश्यकता आहे.
पात्रा म्हणाले की, स्वच्छ भारत अभियानांतर्गत गेल्या आठ वर्षांत 11 कोटी शौचालये बांधण्यात आली आहेत. देशभरात 70 वर्षांत 60 टक्के शौचालये बांधली गेली, तर सात-आठ वर्षांत 21 टक्के काम पूर्ण झाले. उज्ज्वला योजना, बेटी बचाओ-बेटी पढाओ, पोषण अभियान, मुद्रा योजनेसह केंद्र सरकारच्या इतर महत्त्वाकांक्षी योजनांचा संदर्भ देत पात्रा म्हणाले की, यामुळे महिला आणि समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या लोकांचे सक्षमीकरण झाले आहे.
Narendra Modi needs to be seen as a social reformer, not only as a Prime Minister
महत्त्वाच्या बातम्या
- किरीट सोमय्यांसोबत दरेकरांवर सूडबुध्दी, मुंबई बँक प्रकरणात पुन्हा चौकशी
- रसातळातल्या काँग्रेसचे उपद्रवमूल्य!!; भारतीय संघराज्याला उलट्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न!!
- घरच्याच आव्हानांमुळे समाजवादी पक्षाचे बालेकिल्ले ढासळू लागले, विधान परिषदेत बसणार झटका
- शहाबाज शरीफांना शपथ देण्यापूर्वीच पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी अचानक आजारी!!